spot_img
4.6 C
New York
Sunday, November 30, 2025

Buy now

spot_img

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी…
मुंबई/ सार्वमंथन प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना व्हॉट्सअॅपवरून भीषण बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. संदेशात 34 वाहनांत बॉम्ब बसवला असून 400 किलो RDX आणल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणामुळे शहरात हाय अलर्ट जाहीर करून नाकेबंदी, संशयित वाहनांची तपासणी आणि सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. सायबर सेल आणि ATS तपास करत असून धमकी खरी की खोटी याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे
Previous article
मुंबईत मराठा बांधवांच्या आंदोलनाने चांगलाच जोर पकडला असून मुंबई पोलिसांनी अखेर आंदोलनास आणखीन एक दिवसासाठी आंदोलनास परवानगी दिलेली आहे तर गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांस अटक करण्याची मागणी केली आहे . गुणरत्न सदावर्ते म्हणाले की ,’ कायद्यासमोर जरांगेला मोठं समजू नये. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जरांगे ऐकला नाही तर चुकीची प्रथा पडेल. नियम मोडले जातील. यामुळे आगामी काळातील आंदोलनांमध्येही नियम मोडण्याची प्रथा पडेल. हे कायद्याचं राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणातात यापेक्षा कायदा काय म्हणतो हे पाहून सहा वाजल्यानंतर जरांगेला अटक करून माननीय मॅजिस्टेट यांच्यासमोर उभे करा. कारण कायद्याची पायमल्ली महाराष्टाला परवडणारी नाही ,’ दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करत असून आज या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. आज सायंकाळी 6 वाजता या आंदोलनाला असलेली मुदत संपताच आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी दिली आहे त्यामुळे आता आंदोलन उद्याही सुरु राहणार आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी निवृत्ती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. आज निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी शिंदे समितीने मागण्यांची अंमलबजावणीसाठी काही वेळ मागितला. मात्र जरांगे पाटलांनी हैदराबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक मिनिटही वेळ देणार नाही असं विधान केलं आहे. शिंदे समितीने मनोज जरांगेकडे वेळ मागितला. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘ शनिवार-रविवारच्या आत काही झालं नाही तर एकही मराठ्याचं लेकरूबाळ घरी राहणार नाही. महाराष्ट्रातील मराठा घरात दिसणार नाही. आणखी वेळ गेली नाही. तुमचा अहवाल घ्यावा त्यांनी आणि अंमलबजावणी करावी. मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे, असं जाहीर करा आणि उद्यापासूनच प्रमाणपत्र द्या.’
Next article

Related Articles

राज्यातील पहिल्या टप्प्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.. 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर ला मतमोजणी

मुंबई सार्वमंथन/   राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका...

५ नोव्हेंबरला राहुरीत भाजप-महायुतीचा निर्धार मेळावा नामदार राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांना देणार मार्गदर्शन

राहुरी / प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवसंजीवनी देणारा ठरणारा भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा     निर्धार मेळावा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!