spot_img
21.6 C
New York
Thursday, June 4, 2026

Buy now

spot_img

भव्य कुस्ती स्पर्धांनी रंगणार तमनर आखाडा : मुळामाई देवी यात्रा उत्सवात ‘मुळामाई केसरी’ किताबासाठी १.९९ लाखांचे बक्षीस

भव्य कुस्ती स्पर्धांनी रंगणार तमनर आखाडा : मुळामाई देवी यात्रा उत्सवात ‘मुळामाई केसरी’ किताबासाठी १.११ लाखांचे बक्षीस..

राहुरी ( सार्वमंथन /प्रतिनिधी)

राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे ग्रामदैवत मुळामाई देवी यात्रा उत्सवानिमित्त मंगळवार दि. २४ मार्च २०२६ रोजी सायं. ४ वाजता भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान रंगणार आहे. या स्पर्धेमुळे परिसरातील कुस्तीप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

कै. तुकाराम सखाराम तमनर यांच्या स्मरणार्थ सरपंच सौ. मनीषा आप्पासाहेब तमनर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या ‘मुळामाई केसरी’ कुस्ती विजेत्यास तब्बल ₹१,११,००० रोख व चांदीची गदा प्रदान करण्यात येणार आहे.

या जंगी मैदानासाठी राज्यातील नामांकित मल्ल सहभागी होणार असून विविध गटांतील कुस्त्यांसाठी ₹४४ हजार, ₹३२ हजार, ₹४ हजार तसेच इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धेला हिंदुधर्मरक्षक सागर भैय्या वेग, महाराष्ट्र केसरी पै. गुलाबनाना बर्डे यांसारख्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच पै. महेश फुलमाळी, पै. विजय शिंदे, पै. धुळाजी इरकर, पै. सागर कोल्हे यांच्यासह अनेक दिग्गज मल्ल मैदानात उतरणार आहेत.

यामध्ये पै. सौरव शिंदे विरुद्ध पै. समर्थ पाटील, पै. प्रथम मोदी विरुद्ध पै. योगेश चंदेल, पै. उत्कर्ष कर्डिले विरुद्ध पै. रोहन बेलकुंद्री, पै. करण हाटकर विरुद्ध पै. प्रतीक गायकवाड यांसारख्या रंगतदार कुस्त्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. महिला कुस्त्यांचाही समावेश असून पै. ज्ञानदा पठारे व पै. ज्ञानदा ठोंबरे यांच्यातील लढत विशेष आकर्षण ठरणार आहे.

या कुस्ती स्पर्धांचे आयोजन मुळामाई कुस्ती मैदान व समस्त ग्रामस्थ तमनर आखाडा यांच्या वतीने करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जंगी मैदानाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधान परिषदेचे सभापती शिंदे मंत्री विखेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल..

अहिल्यानगर/ सार्व मंथन /प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सोमवारी दमदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज...

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती     कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त सेवा-समर्पणाचा संदेश; अक्षयदादा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम गाजला     दिव्य सार्वमंथन/ प्रतिनिधी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!