अहिल्या नगर/
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागापूर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल जनता दरबारच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा घालून ९ जणांना पकडले. त्यांच्याकडून ३९ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. किरण प्रभाकर पानपाटील (रा. भिंगार), अविनाश माणिकराव भोसले (रा. पाथर्डी), एकनाथ केरू कोतकर (रा. इसळक), प्रदीप भाऊसाहेब कोहोक (रा. दौलावडगाव), महेंद्र शिवराय कदम (रा. नवनागापूर), रवींद्र रावसाहेब साळवे (रा. निंबळक), अनिल चंदू मके (रा. निंबळक), विशाल भाऊसाहेब पाटोळे (रा. नागापूर), नीलेश भालचंद्र भाकरे (रा. नागापूर) असे
पकडलेल्यांची नावे आहेत. एमआयडीसी परिसरातील हॉटेल जनता दरबारच्या बाजूला मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने छापा घालून वरील लोकांना जुगार खेळताना पकडले. त्यांच्याकडून सुमारे ३९ हजार रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिस नाईक सोमनाथ झांबरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. पोलिस हेडकॉन्स्टेबल साबीर शेख गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
एसटीबस प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगमध्ये ठेवलेले मंगळसूत्र कोणीतरी चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. ११) सकाळी घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मंडाबाई सर्जेराव नवले (रा. गुरवपिंप्री, ता. कर्जत) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, रविवारी सकाळी वाळूज ते माळीवाडा अहिल्यानगर एसटी बसने प्रवास करीत असताना सोन्याचे मंगळसूत्र बरोबर असणाऱ्या संगीता गावडे यांच्या बॅगमध्ये ठेवण्यासाठी दिले. ते मंगळसूत्र कोणीतरी चोरट्याने चोरून नेले.




