spot_img
21.4 C
New York
Saturday, September 19, 2026

Buy now

spot_img

राज्यातील पहिल्या टप्प्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.. 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर ला मतमोजणी

मुंबई सार्वमंथन/

 

राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका राज्यासाठी एक उत्सव ठरणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

आज चार वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा, टप्पे आणि इतर तपशील जाहीर करण्यात आले. निवडणुका ईव्हीएमद्वारे होतील. ओबीसी आरक्षण आणि मतदारयादी सुधारणांवरही स्पष्टता येईल. राज्यातील राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून, स्थानिक मुद्द्यांवरून जोरदार सामना रंगणार आहे.

२४६ नगरपालिका आणि ४२ नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मतदारसंघनिहाय ७ नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मोबाईल अॅपमधून आपले नाव तपासू शकता. मतदारांना उमेदवारांची माहिती देखील मिळणार आहे.

दुबार मतदार संदर्भात आयोगाने दक्षता घेतली आहे. दुबार मतदाराच्या नावापुढे स्टार असणार आहे. अधिकारी त्यांची चौकशी करतील. अन्यत्र मतदान करणार नाही, याची हमी घेतली जाईल, असे आयोगाने सांगितले. दुबार मतदारांची वेगळी यादी असणार आहे.

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

अर्ज दाखल करण्याची तारीख १० नोव्हेंबर २०२५

अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख १७ नोव्हेंबर २०२५

नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबरला होईल.

अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर आहे.

उमेदवारांची अंतिम यादी २६ नोव्हेंबरला जाहीर होईल.

मतदान २ डिसेंबर रोजी होईल

तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होऊन निकालही त्याच दिवशी जाहीर होईल

यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. या निवडणुकीत १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदान करणार आहेत.

Related Articles

पालकमंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाज! ढोल पथकात जाऊन वाजवला दणदणीत ढोल.

पालक मंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाजे! ढोल पावताला वाजवला दाणदणीत ढोल. श्रीरामपूर गणेशोत्सव उत्साह शिगेला भेटायला हवे होते. सार्वजनिक गणेशोत्सव श्रीरामपूर दौऱ्यांवर विखे पाटलांनी ढोल...

सामाजिक कार्यकर्ता नाना डोंगरे को ‘दादा साहब फाल्के स्मृति दिवस सम्मान पुरस्कार’ से सम्मानित किया गया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!