राहुरी फाॅक्टरी/
राहुरी फॅक्टरी येथील वाणी मळा परिसरातील हॉटेल ताईसाहेब समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिहार राज्यातील मुस्तफाबाद येथील सानी बसंतपूर ४८ वर्षीय व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत बुधवारी रात्री मृत्य झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की,बिहार राज्यातील मुस्तफाबाद येथील सानी बसंतपूर येथील श्री राम सहा हा पायी जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. घटनास्थळी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे, सोमनाथ देठे, अनिल वाणी, विकास सौदागर संतोष सौदागर, योगीराज कुलकर्णी यांनी धाव घेत मदत कार्य केले. याबाबत राहुरीच्या सरकारी वैद्यकीय सूत्रांनी सदर व्यक्तीस मृत म्हणून घोषित केले असून मयताचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
राहुरी पोलीस बिहार पोलिसांशी संपर्क करून नातेवाईकांशी संपर्क साधत असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले आहे




