राहुरी /
डॉ तनपुरे कारखाना बिनविरोध करण्यासाठी या प्रक्रियेत जेष्ठ लोकांनी एकत्रीत बसावे व निर्णय घ्यावा यामध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील अशा लोकांना बरोबर घ्यावे यामध्ये कारखाना बचाव कृती समितीचे सर्व निर्णय व अधिकार ज्येष्ठ नेते अरुण कडू व अमृत धुमाळ यांना दिलेले आहे. या सर्व जेष्ठ नेत्यांनी एकत्रीत बसवुन तोडगा काढावा व त्या मध्ये जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहिल अन्यथा आमाचा मार्ग तयार असल्याचे कारखाना बचाव कृती समितीचे ज्येष्ठ नेते अजित कदम यांनी म्हटले आहे.
राहुरी येथे पत्रकार परिषदेमध्ये कारखाना बचाव कृती समितीचे ज्येष्ठ नेते अजित कदम हे पत्रकारांशी बोलत होते.
निवडणूक जर बिनविरोध करायची असेल तर गावगाडा चालवणाऱ्यांनी एकत्र येऊन मगच निर्णय घ्यावा अन्यथा
कारखाना बचाव कृती समिती मध्ये सर्वच उमेदवार उच्च शिक्षित आहे.
आमची कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याची भुमिका आहे.
मात्र तालुक्यातील जिल्हा बँकेचे चेअरमन
शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जेष्ठ नेते सुभाष पाटील यासह अदि लोकांनी एकत्र यावे आम्ही यासाठी तयार आहे. कारखाना बचाव कृती समितीशी. चर्चा करायची असेल तर आमचें जेष्ठ नेते अरुण कडू,व अमृत धुमाळ यांच्याशी संपर्क करावा असे मत अजित कदम व्यक्त केले.
चौकट…
कारखाना बचाव कृती समितीचा फार्मूला मान्य होणार का..?
डॉ.तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 48 तासचा कालावधी शिल्लक आहे.
दरम्यान
या दरम्यान कारखाना बचाव कृती समितीने जो फाॅर्मूला ठेवला आहे यामधे हा फार्मूला कोण कोण मान्य करणार? हे पाहणी महत्वाच्या ठरणार आहे .




