राहुरी. फॅक्टरी /
राहुरी कारखाना परिसरात एका संस्थेत जेष्ठ पदाधिकारी म्हणून असलेल्या ६५ वर्षीय आप्पाने चांगलाच कहर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वता आपल्या चारचाकी गाडीतून नको त्या ठिकाणी कॉलनीत गाडी चालवत जात असतांना दुचाकी वर समोरून येणाऱ्या दोन तरुणांना चिरडुन अपघात केला.
अपघात झाल्यानंतर जखमी तरुणांना उपचारासाठी नेणे गरजेचे असताना मात्र त्यांना रुग्णालयात न नेता तसेच आप्पाने गाडी चालवत नेली.
दुचाकी वरून पडून जखमी झालेल्या तरुणांना आजूबाजूच्या नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
आप्पाने केलेल्या या कृत्या बाबत संताप व्यक्त केला जात आहे.
आप्पा एवढ्या घाई घाई मध्ये दोन तरुणांना आपल्या चार चाकी गाडीने उडून कुठे जायचं होतं.?
आप्पाला चाळीमध्ये असे कोणते महत्त्वाचे काम होते.?
की जखमी झालेल्या तरुणांना बघायलाही वेळ दिला नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.




