अहिल्यानगर येथील 7 ते 8 तरुण धरण बघण्यासाठी आले होते..
राहुरी : दि.२० मे.
अहिल्यानगर जिल्ह्याला जीवनदायी ठरलेले राहुरीच्या मुळा धरणावर नगर एमआयडीसी येथून फिरण्यासाठी आलेल्या तरुणांना पोहण्याचा मोह आवरला नाही,धरणात पोण्यासाठी पाण्यात उतरलेला 35 वर्षीय विवाहित तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
भगवान रुस्तुम घाडगे वय वर्षे 35 राहणार नागापूर रेणुका माता मंदिर परिसर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा विवाहित तरुण आपल्या सात ते आठ मित्रां बरोबर रविवार दिनांक 18 मे रोजी मुळा धरण येथे फिरण्यासाठी आला होता मुळा धरणाचे पाणी पाहून धरणामध्ये पोहण्याचा मोह न आवरल्याने सर्व तरुण हे पाण्यामध्ये होण्यासाठी उतरले यावेळी भगवान घाडगे हा पोहत असताना अचानक पाण्यात बुडू लागला तरुणांनी मोठी आरडाओरड केली मात्र तो गायब झाला.
यावेळी बरोबर आलेल्या तरुणांनी भगवान याचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही,अखेर भगवान घाडगे यांचा मृतदेह मंगळवार दिनांक 20 मे मुळा धरणाच्या मत्स उद्योग केज परिसरात सकाळी सहा वाजे दरम्यान पाण्यावर तरंगताना आढळून आला.
घाडगे यास पाण्याच्या बाहेर काढून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन मृत घोषित करण्यात आले.
भगवान घाडगे याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
भगवान घाडगे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन, मुली, भाऊ असा परिवार आहे.
नगर एमआयडीसी मधिल कंपनीमध्ये काम करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होते.
त्यांच्या या अचानक झालेल्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.




