spot_img
23.2 C
New York
Saturday, June 7, 2025

Buy now

spot_img

राहुरी शहर व तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी

राहुरी शहर व तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी
राहुरी / दि.7 जुन
त्याग व बलिदानाचा संदेश देणारा बकरी ईद (ईद-उल अजहा) हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण राहुरी शहरात ईदगाह मैदानावर नमाज पठण करून उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील ईदगाह मैदानावर  हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत कादरीया मस्जिदचे इमाम मुफ्ती कमरे आलम, मुफ्ती मुज्जमील, मुफ्ती अफजल यांच्या मार्गदर्शनाखाली ईदची नमाज पठण केली. दानधर्म, संयम, शांतता, एकता, देशप्रेम, आई-वडिलांची सेवा हा संदेश यावेळी देण्यात आला.
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, वांबोरी, सोनगाव, राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा, टाकळीमिया, मानोरी आदी ठिकाणीही बकरी ईदची नमाज उत्साहात पठण करण्यात आली.
अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

Related Articles

तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांतच संसार मोडला

बीड दि.7 जुन मी अशिक्षित. दीड एकर खडकाळ जमीन. आमचे आयुष्यच ऊसतोडणीत गेले. आता २८ वर्षांचा झालो. दोन-तीन वर्षांपासून लग्नासाठी बायको पाहतो, पण भेटलीच नाही....

पर्यावरण दिनानिमित्त माफ़सूच्या संचालनालय विस्तार शिक्षण येथे वृक्षारोपण*

पर्यावरण दिनानिमित्त माफ़सूच्या संचालनालय विस्तार शिक्षण येथे वृक्षारोपण.. नागपूर दि. 07 जुन : प्रवीण बागडे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विश्वविद्यालय...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!