spot_img
19.4 C
New York
Sunday, September 20, 2026

Buy now

spot_img

राहुरी शहर व तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी

राहुरी शहर व तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी
राहुरी / दि.7 जुन
त्याग व बलिदानाचा संदेश देणारा बकरी ईद (ईद-उल अजहा) हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण राहुरी शहरात ईदगाह मैदानावर नमाज पठण करून उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील ईदगाह मैदानावर  हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत कादरीया मस्जिदचे इमाम मुफ्ती कमरे आलम, मुफ्ती मुज्जमील, मुफ्ती अफजल यांच्या मार्गदर्शनाखाली ईदची नमाज पठण केली. दानधर्म, संयम, शांतता, एकता, देशप्रेम, आई-वडिलांची सेवा हा संदेश यावेळी देण्यात आला.
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, वांबोरी, सोनगाव, राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा, टाकळीमिया, मानोरी आदी ठिकाणीही बकरी ईदची नमाज उत्साहात पठण करण्यात आली.
अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

Related Articles

पालकमंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाज! ढोल पथकात जाऊन वाजवला दणदणीत ढोल.

पालक मंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाजे! ढोल पावताला वाजवला दाणदणीत ढोल. श्रीरामपूर गणेशोत्सव उत्साह शिगेला भेटायला हवे होते. सार्वजनिक गणेशोत्सव श्रीरामपूर दौऱ्यांवर विखे पाटलांनी ढोल...

सामाजिक कार्यकर्ता नाना डोंगरे को ‘दादा साहब फाल्के स्मृति दिवस सम्मान पुरस्कार’ से सम्मानित किया गया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!