एकेकाळी नाव लौकिक मिळविलेल्या राहुरी नगरपरिषदेची झाली दुरवस्था…
राहुरी नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या शहरातील विविध समस्यांनी त्रास्त झालेल्या नागरीकांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पालिकेच्या कार्यालयीन वेळेत दाखल होऊन सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी करत मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना धारेवर धरत काम का केली जात नाही, शहराची काय अवस्था झाली आहे.
शहरातील सर्व भागातील रस्त्यांची किय दुरवस्था झाली आहे,शाळा सुरु झाल्या लहान मुलांना,व सायकलवर जाणाऱ्या विद्यार्थ्यीनी यांना शाळा महाविद्यालयात जात असतांना रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात पडुन जखमी होत आहे.
शहरात पाय तर सोडा पण वाहनावरही जातांना नागरीकांना कसरत करावी लागत आहे.
शहरातील वाड्या वस्त्यावर रस्त्यावर मुरुम तर टाका,शहरात आरोग्याची काय अवस्था झाली आहे.
तुम्ही का लक्ष देत नाही, शहरातील कामे का ठप्प झाले, पावसाळा सुरु झाला तरीही रस्त्यांची कामे का केली नाही, माणसं मेल्यावर रस्ते करणार का ? असे अनेक प्रश्नांचा भडीमार करत मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना धारेवर धरत काम सुधारण्याच्या सुचना केली अन्यथा येणाऱ्या काळात मोठे जण आंदोलन करण्याचा इशारा यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
शहरातील कनगर रोडसह अदि रस्त्यांची झालेली दुरवस्था बाबत अधिकार्यांची चांगलीच कान उघडणी केली.
अनेक ठिकाणच्या कामाची प्रशासकिय मान्यता आली असतांना टेंडर का नाही,तिन तिन चार चार महिने टेंडर का झाली नाही काही शुभमुहूर्तावर ठरवायचा होता का ?असा खडा सवाल तनपुरे यांनी केला.
यावेळी दशरथ पोपळघट,अनिल कासार, सुर्यकांत भुजाडी, बाळासाहेब उंडे, गजानन सातभाई, निलेश जगधने, राजु धनवटे, बाळासाहेब केळकर,अशोक आहेर, प्रदिप भुजाडी, प्रदिप राउत, आप्पासाहेब वराळे,अरुण साळवे, विजय करपे, राजेंद्र शिंदे, पप्पू माळवदे अदि यावेळी उपस्थित होते.
शहरातील आरोग्य सुविधा बाबत का गांभीर्याने घेतले जात नाही,बुरुड गल्ली, तनपुरे वाडी रोड,नवि पेठ,पाणी टाकी परिसर, आझाद चौक,खाटीक गल्ली स्टेशन रोड,माळी गल्ली,मल्हारवाडी रोड,कनगर रोड परिसर अदि भागात आरोग्याचा बोजवारा उडाला आहे.
राहुरी नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी नंदकुमार भोर यांनी शहरातील अनेक मोकळ्या भूखंडावर अनेकांनी अतिक्रमण केली आहे.
तक्रार करुणही तुम्ही का चौकशी करत नाही,
माझ्या घराजवळ अतिक्रमण झाले आहे, ते दोन दिवसात काढले नाही तर पालिकेच्या समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा भैर यांनी दिला,
तुम्ही शहरातील अतिक्रमण काढले मग ते अतिक्रमणे का काढले नाही, शहरातील शिवाजी चौक ते शनि मंदिर कुलकर्णी हॉस्पिटल चा रोड ४० फुट रस्ता अतिक्रमण मुक्त केला का,? न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अतिक्रमण काढले ते फक्त सर्वसामान्यांचे का ? अतिक्रमण का काडली नाही असा सवाल पत्रकार सुनिल भुजाडी यांनी मुख्याधिकारी यांना केला.




