सेवानिवृत्त ग्रामसेवकाकडुन स्विकारले १० हजार.., पंचायत समितीत अनेकांची डोकेदुखी वाढणार…?
राहुरी / दि.२० जुन
राहुरी तालुक्यातील गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे यास सेवानिवृत्त ग्रामसेवकाकडून १० हजाराची लाच स्विकारतांना जेरबंद करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सदर प्रकार हा अहिल्या नगर शहरात घडल्याचे समजले आहे.
निलंबित ग्रामसेवकाने राहुरीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी १० हजाराची लाच घेतल्या प्रकरणी अहिल्या नगरच्या अँटीकरप्शन विभागाने कारवाई केली आहे.
या कारवाईमुळे राहुरी तालुक्यातील पंचायत समिती प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
राहुरी तालुक्यातील दोन ते तीन महिन्यापूर्वी एका ग्रामसेवकावर गटविकास अधिकारी यांनी निलंबनची कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे.
यानंतर महिन्याभरापूर्वी संबंधित ग्रामसेवक हे सेवानिवृत्त झाले होते.
सेवानिवृत्त झाल्या नंतर संदर्भात कागदपत्री कामे मार्गी लावण्यासाठी रकमेची मागणी केली असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
सदरच्या कारवाईमुळे राहुरी येथील पंचायत समिती प्रशासनामध्ये चांगलाच सन्नाटा पसरला आहे.
मात्र सायंकाळी पाच वाजे दरम्यान उशिरापर्यंत माहिती समजु शकली नाही..




