वांबोरी सार्वमंथन /
राहुरी तालुक्यातील खडांबे व पंचक्रोशीच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा अत्यंत शोकमय वातावरणात खडांबे येथे पार पडली.
या प्रसंगी गावकऱ्यांसह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक शांत प्रार्थना घेण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा, समाजसेवेचा आणि शेतकरीहिताच्या वाटचालीचा स्मरण करून डोळे पाणावले. समाज प्रबोधनकार ह.भ.प. चंद्रकांत महाराज खळेकर, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज खळेकर, भाऊसाहेब महाराज कल्हापुरे यांनी श्रद्धांजली संदेशातून सांगितले की,“शिवाजीराव कर्डिले हे फक्त राजकारणी नव्हते, तर ते खेड्यापाड्यातील लोकांच्या समस्या सोडवणारे नेते होते. त्यांचा मार्गदर्शनाचा आणि जनसेवेचा वारसा प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे नेला पाहिजे.” या प्रसंगी डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे माजी संचालक सुरसिंग पवार,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष दिलीप जठार,मा. उपसभापती बाळासाहेब लटके, चेअरमन संजय हरिश्चंद्रे, भानुदास कल्हापुरे, अर्जुन खळेकर (भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष),तसेच प्रभाकर हरिश्चंद्रे, शामराव खेसम्हाळसकर, कानिफनाथ कल्हापुरे, बाळासाहेब जठार, राजेंद्र कल्हापुरे, भरत पवार, मकरंद कारले, प्रकाश पारे, सुरेश ताकटे, बाळासाहेब कल्हापुरे, यशवंत ताकटे, बाबासाहेब कल्हापुरे, गोरख शेळके, प्रकाश कल्हापुरे, प्रवीण हरिश्चंद्रे, सचिन देठे, किशोर कल्हापुरे, सचिन काळे, बाबासाहेब थोरात, मार्कस पवार, बाबासाहेब चोथे, मनोज कल्हापुरे, नितीन कल्हापुरे, देवेंद्र सोनवणे, पंकज थोरात, मच्छिंद्र हरिश्चंद्रे, मनोज शेंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या शेवटी सर्वांनी एकमुखाने ठरविले की,
“स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या समाजकार्याचा वारसा अखंड ठेवण्याचा आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प आपण करुण अक्षय कर्डिले यांच्या बरोबर राहुन हिच खरी स्व शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली.




