राहुरी / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवसंजीवनी देणारा ठरणारा भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता पांडुरंग मंगल कार्यालय राहुरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
स्व शिवाजीराव कर्डिले यांच्या अकस्मात निधनाने कार्यकर्त्यांसह कर्डिले कुटूंबियांना धक्का बसला आहे यामध्ये स्व शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या बरोबर राहून येणाऱ्या सर्वच निवडणुकांना सामोरे जाऊन त्यांच्या पाठीमागे राहण्याचा निर्धार ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार आहे.
या मेळाव्यात राज्यमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप हे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असुन अक्षय कर्डिले हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर राहुरीत भाजप व महायुती कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मेळाव्याच्या तयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नेते उत्तमराव म्हसे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, माजी तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, शामराव निमसे, विक्रम भुजाडी, अक्षय भुजाडी, भैय्यासाहेब शेळके, अण्णासाहेब शेटे, नयन सिंगी, राजेंद्र उंडे, अनिल पवार, गोरक्षनाथ तारडे, राजेंद्र गोपाळे, नितान ढेरे, युवराज गाडे, अशोक घाडगे, अक्षय तनपुरे, आबासाहेब येवले, सचिन पानसंबळ, रविंद्र म्हसे, नारायण धोंगडे, भारत भुजाडी, दिनेश उंडे, शरद किनकर, योगेश गिते, दिपक वाबळे, उमेश शेळके, सुजय काळे, सचिन मेहेत्रे, अरुण डौले, राजेंद्र वराळे, सोपान गागरे, आप्पासाहेब नेहे, अनिल आढाव, सोमनाथ वामन आणि मनोज गव्हाणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत मेळाव्याचे नियोजन, प्रचार आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाबाबत सविस्तर चर्चा झाली. राहुरी तालुक्यातील भाजप व महायुती कार्यकर्त्यांमध्ये या मेळाव्यामुळे नवा जोश व उत्साह दिसून येत असून आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
चौकट…
राहुरी च्या मेळाव्यात नामदार विखे काय बोलणार…!
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्डिले कुटुंबीयांचे पालकत्व स्वीकारले असून अक्षय कर्डिले यांना आमदार बनविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
त्याचबरोबर नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असुन नामदार राधाकृष्ण विखे पाटील या मेळाव्यात काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.




