spot_img
9.3 C
New York
Saturday, March 21, 2026

Buy now

spot_img

कोल्हार भगवतीपुर येथे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात

कोल्हार भगवतीपुर येथे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात

 

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजन;

 

छत्रपतींच्या नावावर राजकारण नको; त्यांच्या विचारांचा आदर्श घ्या : अँड सुरेंद्र खर्डे

 

कोल्हार भगवतीपुर (प्रतिनिधी) :

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे खरे रक्षक आणि सर्वधर्मसमभावाचा आदर्श जगाला दाखविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हार बुद्रुक येथील भगवतीपुर परिसरात तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच अॅड. सुरेंद्र पाटील खर्डे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचा खरा आदर्श समाजाने घ्यावा. आजकाल काही जण महाराजांचे नाव घेऊन वादग्रस्त वक्तव्य करतात आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला व देशाला भोगावे लागतात, ही दुर्दैवी बाब आहे. राजकीय स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धीसाठी महाराजांच्या नावाचा वापर होऊ नये, असेही त्यांनी सांगितले. महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेत रयतेचे राज्य उभारले आणि कुठलाही भेदभाव केला नाही. त्यामुळे समाजातील सर्वांनी एकता, शांतता व बंधुभाव जपत महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास माजी सरपंच अँड सुरेंद्र खर्डे पाटील, शिवसेना (उ.बा.ठा.) जिल्हाउपप्रमुख अनिल बांगरे, कोल्हार बुद्रुक देवालयाचे अध्यक्ष सयाजी खर्डे, ऋषिकेश खांदे, पंढरीनाथ खर्डे, भरत खर्डे, अजित मोरे, अनिल खर्डे, शामराव गोसावी, संजय शिंगवी, डॉ सुनील खर्डे,गोरक्षनाथ खर्डे , सुनील बोरुडे, दत्तात्रय राजभोज, केतन लोळगे, ज्ञानेश्वर खर्डे, अनिल हिरानंदानी, प्रशांत काळे,शाम लोखंडे, वसंतराव मोरे, अक्षय मोरे, आबासाहेब राऊत, विजय गोहर, विजय मोरे, संतोष जोर्वेकर, सागर बांगरे, योगेश कोरडे, कादिर अत्तार, सतीश चव्हाण, सचिन नेहे, निलेश खर्डे, धनंजय घोरपडे, सचिन कोळसे, हर्षद मिजगुले, सागर मोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

भव्य कुस्ती स्पर्धांनी रंगणार तमनर आखाडा : मुळामाई देवी यात्रा उत्सवात ‘मुळामाई केसरी’ किताबासाठी १.११ लाखांचे बक्षीस..

भव्य कुस्ती स्पर्धांनी रंगणार तमनर आखाडा : मुळामाई देवी यात्रा उत्सवात ‘मुळामाई केसरी’ किताबासाठी १.११ लाखांचे बक्षीस..   राहुरी ( सार्वमंथन /प्रतिनिधी)   राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे...

भव्य कुस्ती स्पर्धांनी रंगणार तमनर आखाडा : मुळामाई देवी यात्रा उत्सवात ‘मुळामाई केसरी’ किताबासाठी १.९९ लाखांचे बक्षीस

भव्य कुस्ती स्पर्धांनी रंगणार तमनर आखाडा : मुळामाई देवी यात्रा उत्सवात ‘मुळामाई केसरी’ किताबासाठी १.११ लाखांचे बक्षीस.. राहुरी ( सार्वमंथन /प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!