राहुरी सार्वमंथन विशेष/
राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्ग कॉलेज रोड लगत असलेल्या साहेबराव गाडे यांचे साई टायर या टायरच्या शोरूम ला विजेच्या शाॅटसर्केटने आग लागुन लाखों रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
आज गुरुवार दिनांक 15 मे रोजी पहाटे पहाटेच्या दरम्यान सदर घटना घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी असलेल्या नागरीकांनी सांगितले.
गाडे यांच्या साई टायर या शोरूम मधून धूर निघत असल्याचे शेजारीच असलेल्या वीरकर नामक तरुणाने सदर माहिती शोरूम चे मालक गाडे यांना दिली.
आग लागल्याची माहिती राहुरी व देवळाली प्रवरा, व श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशामनदालास लागताच सुरुवातीला राहुरी नगरपालिकेची अग्निशामन दलाने पाचारण केले. यानंतर देवळाली नगरपालिका यानंतर श्रीरामपूर नगरपरिषदचे अग्निशामन पथकाने येऊन या तिन्ही नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तब्बल दोन तासानंतर आग आटोक्यात आली.
शोरूम मध्ये सर्वच चार चाकी वाहनांची टायर असल्याकारणाने आगेने मोठा भडका घेतला होता आग विझवताना चांगलीच पळापळ झाली होती.
सदर घटनेची माहिती कळताच शहरातील अनेक व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली यासह देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगरध्यक्ष सत्यजित कदम, शिवसेनेचे देवेंद्र लांबे, उद्योजक सतीश घुले, प्रमोद सुराणा यासह आदींनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली.
आग विझवण्यासाठी राहुरीनगरपरिषद अग्निशामक विभागाचे राजेंद्र पवार ,विलास गडाख ,बाळासाहेब पवार ,नंदू मोरे तर यानंतर देवळाली प्रवर नगरपरिषदेचे भारत साळुंखे, सखाहारी सरोदे सुनील ताठे तर श्रीरामपूर नगर परिषद अग्निशमन दलाचे संतोष रासकर,रोहित जाधव, लखन दाभाडे यांनी मोठे परिश्रम घेतली.
चौकट…
80 ते 90 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज…?
अचानक आग लागल्याने गाडे कुटुंबे व नातेवाईकांची चांगलीच धावपळ झाली होती.
आगीमध्ये शोरूम मध्ये असलेली चार नवे ट्रॅक्टर यासह चार चाकी वाहनांची नवे व जुने टायर यासह वाहनांचे स्पेअर पार्ट, फर्निचर आदींचे मोठे नुकसान होऊन सुमारे 80 ते 90 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
चौकट…..
घटनेची माहिती कळताच देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष यांनी धाव घेत देवळाली प्रवरा अग्निशमन दलास पाचरण केले यासह श्रीरामपूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलासही पाचारण करत स्वतः मदत केली.




