spot_img
18.3 C
New York
Thursday, June 4, 2026

Buy now

spot_img

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांचे तीन टेम्पो सोनई पोलिसांनी राहुरी रोडवर पकडले..

शनिशिंगणापूर  (गणेश बेलेकर)
नेवासा तालुक्यातील सोनई येथे राहुरी रोडवरील काॅलेज जवळ तीन पिक अप जनावरांना कत्तली साठी नेत असताना पकडले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी दि. १४ रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास रोडवर एम एच ०९ सिसी ५८८८ व एम एच ०९ ईएम ३७७६ तसेच एम एच ०४ एच एस ००६२  क्रमांक असलेले तीन पिअप व त्यामध्ये विविध जातीचे जनावरे कृरतेने डांबुन कत्तली साठी नेत असताना पकडले .त्यामध्ये एकुण एक लाख ऐंशी हजार रुपयांचे जनावरे व सात लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचे पिक अप असा एकुण नऊ लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. सोमनाथ सुभाष हरेल रा. ब्राम्हणी यांनी सिद्धेश्वर मच्छिंद्र भावले, अशोक शहादेव बुधनर दोघे राहणार खामगाव जिल्हा बिड, परमेश्वर महादेव कोटेकर राहणार शिंगवेगाव, जिल्हा बिड, अर्जुन सर्जेराव सोलनकर, नितीन अर्जुन कोपनर, युवराज शिवाजी लगडे,रिजवानखान अयुबखान पठाण, सर्व राहणार खामगाव जिल्हा बिड, हरिश्चंद्र दासराव हाके रा. माळेवाडी, अझरखान कुरेशी, सादिक अन्सार कुरेशी सर्व राहणार पिंपळनेर जिल्हा बिड यांचे विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र नं. १९२/२०२५ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ५( अ), ५(ब), चे उल्लघंन ९ तसेच प्रतिबध नियम ११ बिएनएस चे कलम ३(५) , मोटार अधिनियम कलम १९२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब बाचकर हे करत आहेत.

Related Articles

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधान परिषदेचे सभापती शिंदे मंत्री विखेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल..

अहिल्यानगर/ सार्व मंथन /प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सोमवारी दमदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज...

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती     कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त सेवा-समर्पणाचा संदेश; अक्षयदादा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम गाजला     दिव्य सार्वमंथन/ प्रतिनिधी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!