spot_img
32.8 C
New York
Friday, June 5, 2026

Buy now

spot_img

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत जनतेला विहित वेळेत सेवा द्या-आयुक्त चित्रा कुलकर्णी

अहिल्यानगर : दि. १७ मे
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा असून या कायद्यांतर्गत जनतेला विहित वेळेत सेवा देण्याचे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले.
  तहसिल  कार्यालय नेवासा येथील सभागृहात तालुकास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत श्रीमती कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी आयोगाचे उपसचिव सुनिल जोशी, सहायक कक्ष अधिकारी प्रशांत घोडके, तहसिलदार संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, उपअधीक्षक भूमीअभिलेख संदीप गोसावी,उप विभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, मृदा व जलसंधारण अधिकारी प्रवीण दहातोंडे, महिला व बालविकास अधिकारी भावना पवार आदी उपस्थित होते.
     श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा आहे. शासकीय कार्यालयातून जनतेला दिल्या जाणाऱ्या सेवांच्या मागणी अर्जामध्ये अधिक वाढ होण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशिलपणे सामान्यांनापर्यंत कायद्याची माहिती पोहोचविण्याची गरज आहे. शासकीय सेवेला केवळ उपजिविकेचे साधन न समजता सेवा देणे हे आद्यकर्तव्य असल्याची भावना मनी बाळगून काम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
  सेवा देताना कारण नसताना विलंब झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची कायद्यात तरतूद असुन अशी कुठलीही वेळ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर येऊ नये याची दक्षता घ्यावी. सेवा देण्यामध्ये काही अडचणी असतील तर आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा. चांगले काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आयोगामार्फत गौरव करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
     बैठकीस सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधान परिषदेचे सभापती शिंदे मंत्री विखेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल..

अहिल्यानगर/ सार्व मंथन /प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सोमवारी दमदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज...

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती     कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त सेवा-समर्पणाचा संदेश; अक्षयदादा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम गाजला     दिव्य सार्वमंथन/ प्रतिनिधी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!