spot_img
4.9 C
New York
Sunday, November 30, 2025

Buy now

spot_img

नगर मनमाड रोड लगत वेश्या व्यवसाय करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल…

दोन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता…

राहुरी तालुका प्रतिनिधी/

शिंगवेनाईक ता.अहिल्यानगर येथील वेश्याव्यवसायावर पिटा कायदयांतर्गत कारवाई
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कामगिरी

पोलीस अधिक्षक राकेश ओला, यांनी पोनि/ दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

नमुद आदेशान्वये पोनि/ दिनेश आहेर यांनी पोनि/सोपान शिरसाठ, कार्यभार एएचटीयु, अहिल्यानगर व स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, सुनिल मालणकर, भगवान थोरात, रणजीत जाधव, विशाल तनपुरे यांचे पथक तयार करुन अवैध धंद्याची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.

दि.18 मे.2025 रोजी पथक एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पोनि/सोपान शिरसाठ यांना माहिती मिळाली की, हॉटेल दोस्ती, शिंगवे नाईक गावचे शिवार येथे बल्ली साळवे हा काही महिलांकडून कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवत आहे.पथकाने मिळालेल्या माहितीवरून अहिल्यानगर ते मनमाड महामार्गावर शिंगवेनाईक गावचे शिवारात हॉटेल दोस्ती येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता पथकातील पोलीस अंमलदार बनावट ग्राहक म्हणुन पाठविले.तपास पथकाने नमूद हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असलेबाबत खात्री पटल्यानंतर पंचासमक्ष हॉटेलवर छापा टाकुन इसम नामे दिपक भाऊसाहेब साळवे, वय 30, रा.शिंगवे नाईक, ता.अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन 20,000/- रूपये किंमतीचा एक मोबाईल व 1,000/- रूपये रोख रक्कम असा एकुण 21,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी दिपक भाऊसाहेब साळवे याचेसह हॉटेल दोस्तीची पाहणी करता हॉटेलच्या रूममध्ये 02 महिला मिळून आल्या.नमुद महिलाकडे विचारपुस करता त्यांनी सदरचे हॉटेल ताब्यातील आरोपी व 2) बल्ली उर्फ बाबासाहेब भाऊसाहेब साळवे, रा.शिंगवेनाईक, ता.अहिल्यानगर (फरार) असे दोघे चालवित असून त्यांनी नमूद महिलांना वेश्या व्यवसायाकरीता आणल्याचे सांगीतले.तसेच ग्राहकाकडून मिळणारे काही पैसे महिलांना देऊन त्यांचेकडून वेश्याव्यवसाय करून घेतात.वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर त्यांची उपजीविका चालते, अशी माहिती सांगीतली.

तपास पथकाने दिनांक 18 मे.2025 रोजी हॉटेल दोस्ती, शिंगवेनाईक, ता.अहिल्यानगर येथे छापा टाकुन केलेल्या कारवाईमध्ये आरोपी नामे 1) दिपक भाऊसाहेब साळवे, वय 30, रा.शिंगवे नाईक, ता.अहिल्यानगर 2) बल्ली उर्फ बाबासाहेब भाऊसाहेब साळवे, रा.शिंगवेनाईक, ता.अहिल्यानगर (फरार) हे स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता 02 महिलांकडून कुंटणखाना चालवून त्यावर आपली उपजिवीका करताना मिळून आल्याने त्यांचेविरूध्द एमआयडीसी पोलीस स्टेशन गुरनं 404/2025 स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 6, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर व संपतराव भोसले, नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

राज्यातील पहिल्या टप्प्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.. 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर ला मतमोजणी

मुंबई सार्वमंथन/   राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका...

५ नोव्हेंबरला राहुरीत भाजप-महायुतीचा निर्धार मेळावा नामदार राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांना देणार मार्गदर्शन

राहुरी / प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवसंजीवनी देणारा ठरणारा भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा     निर्धार मेळावा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!