spot_img
32.8 C
New York
Friday, June 5, 2026

Buy now

spot_img

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीतील राहुरी फॅक्टरी परिसरात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ….?

 

नागरिकांचे आरोग्य धोक्यात…? आरोग्य विभागातील त्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता..!
राहुरी फॅक्टरी / दि. 3 जून

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील क वर्ग दर्जा असलेल्या नगरपालिका हद्दीमध्ये घाणीचे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी अपुरे पडत असल्याकारणाने स्वच्छतेचा अक्षरशा बुजवारा उडाला असल्याने नगरपालिकेच्या या कारभाराबाबत नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
देवळाली नगर परिषदेवर प्रशासक राज असल्याकारणाने नगरपालिकेच्या हद्दीत आरोग्यमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राज्यात स्वच्छतेबाबत बक्षीस मिळविणाऱ्या देवळाली प्रवारा नगरपालिका प्रशासन स्वच्छतेबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी आरोप केला आहे.
मात्र प्रशासकाच्या छुप्या आशीर्वादाने आरोग्याचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना आरोग्य बाबत सामना करावा लागत आहे.
देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दित चेंबर उघडे असून यामध्ये काही ठिकाणी गटारीच्या चेंबर मधून दुर्गंधी युक्त सांडपाणी बाहेर येताना दिसत आहे.
अशीच काहीशी परिस्थिती अंबिका नगर, प्रसाद नगर, आदिनाथ वसाहत, गुरुकुल वसाहत देवळाली परिसरातील विविध भागामध्ये निदर्शनास येत आहे. ठेकेदारांनी नेमून दिलेल्या सफाई कामगार हे संबंधित ठिकाणी साफसफाई व स्वच्छता करत नसल्याने नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
देवळाली नगरपालिकेने स्वच्छता भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यात कपात केले असल्याचे समजले असुन नगर परिषदेच्या हद्दीत घाणिचे साम्राज्य झालेले आहे.
प्रसाद नगर भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच त्यासमोरील असलेले शौचालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काटेरी झाडी झुडपी वाढलेली असून याकडे पालिकेचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे.
हे कामे त्वरित न झाल्यास नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे नगर पालिकेने लक्ष न दिल्यास लवकरच नागरिक पालिकेवर मोर्चा आणण्याच्या तयारीत असल्याचे समजले आहे.

  • सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र / प्रतिनिधी अभिजीत आहेर
    राहुरी फॅक्टरी

Related Articles

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधान परिषदेचे सभापती शिंदे मंत्री विखेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल..

अहिल्यानगर/ सार्व मंथन /प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सोमवारी दमदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज...

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती     कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त सेवा-समर्पणाचा संदेश; अक्षयदादा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम गाजला     दिव्य सार्वमंथन/ प्रतिनिधी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!