spot_img
19.9 C
New York
Saturday, September 19, 2026

Buy now

spot_img

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती

  1. रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती

 

 

कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त सेवा-समर्पणाचा संदेश; अक्षयदादा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम गाजला

 

 

दिव्य सार्वमंथन/ प्रतिनिधी

स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या जयंतीनिमित्त अक्षयदादा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराने सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमास पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी उपस्थित राहून कर्डिले साहेबांना अभिवादन केले.

समाजसेवा, जनसंपर्क आणि लोकहिताच्या कार्यातून स्व. कर्डिले यांनी उभा केलेला आदर्श आजही प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत गरजूंसाठी ‘जीवनदान’ देण्याचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्व. कर्डिले साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत रक्तदात्यांचे कौतुक केले. अशा सामाजिक उपक्रमांमधून समाजहिताची भावना अधिक दृढ होत असून कर्डिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

पालकमंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाज! ढोल पथकात जाऊन वाजवला दणदणीत ढोल.

पालक मंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाजे! ढोल पावताला वाजवला दाणदणीत ढोल. श्रीरामपूर गणेशोत्सव उत्साह शिगेला भेटायला हवे होते. सार्वजनिक गणेशोत्सव श्रीरामपूर दौऱ्यांवर विखे पाटलांनी ढोल...

सामाजिक कार्यकर्ता नाना डोंगरे को ‘दादा साहब फाल्के स्मृति दिवस सम्मान पुरस्कार’ से सम्मानित किया गया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!