राहाता तालुक्यातील एका गावात हिंदुत्वाचे काम करतो म्हणून तरुणाला 20 ते 25 तरुणांकडून माहाण..
राहाता/दि.१२ जुन …
राहाता तालुक्यातील हनुमंत गाव येथे एका हिंदुत्ववदी संघटनेमध्ये काम करत असलेल्या तरुणाला टोळक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
सदर तरुण हा आरएसएस व बजरंग दल या हिंदू संघटनांचे समर्थन करतो त्यासंदर्भात स्टेटस ठेवतो पोस्ट करतो म्हणून मुस्लिम समाजाच्या 20 ते 25 जणांच्या टोळक्याकडून हिंदू मुलाला जबर मारहाण करण्यात आली आहे.
त्या संदर्भातील सर्व पुरावे असतानाही लोणी पोलीस प्रशासनाकडून तक्रार दाखल करण्यासाठी तसेच फिर्याद बदलण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याने संबंधित तरुण उद्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर प्रकारा बद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील सकल हिंदू समाजा कडून तीव्र निषेध केला जात असून आरएसएस व बजरंग दल या संघटनांनी दोषींवर कारवाई करण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.




