वांबोरी /दि.21 जुन
तु माझ्या विहीरीवर यायचे नाही, विहीर माझी आहे, असे म्हणून सख्खा भाऊ असलेल्या आरोपीने काशिनाथ बुचूडे यांना शिवीगाळ करुन लाकडी काठीने मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दि. १८ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली.
काशिनाथ वामन बुचूडे, वय ४८ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे राहतात. त्यांच्या शेती शेजारीच त्यांचा भाऊ तुकाराम वामन बुचूडे यांची शेती असुन शेतीतील विहीरीचे पाणी सामाईक असुन विहीर तुकाराम बुचूडे याच्या शेतात आहे.
दि. १८ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास काशिनाथ बुचूडे हे त्यांच्या शेतीला पाणी द्यायचे असल्याने विहीरीवर मोटार चालु करण्याकरिता गेले. तेथे आरोपी आला व म्हणाला की, तु माझ्या विहीरीवर यायचे नाही, विहीर माझी आहे. तु जर माझे शेतात येवुन विहिरीचे पाणी घेतले तर तुचे हात पाय मोडेन असे म्हणुन तो शिविगाळ करू लागला.
तेव्हा काशिनाथ बुचूडे हे त्याला समजावुन सांगत असताना त्याने काशिनाथ बुचूडे यांना लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. तेव्हा त्यांची भावजय उज्वला तुकाराम बुचुडे ह्या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता आरोपीने त्यांनाही लाकडी काठीने मारहाण करून शिविगाळ दमदाटी केली व मला म्हणाला की सदर विहिरीवर तुझा कोणताही हिस्सा नाही. तु विहिरीवर यायचे नाही व आपला ट्रॅक्टर हा फक्त माझा आहे त्यात कोणाचाही वाटा नाही. असे म्हणुन जीवे मारण्याची धमकी दिली.
काशिनाथ वामन बुचूडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात त्यांचा भाऊ आरोपी तुकाराम वामन बुचूडे, रा. वांबोरी, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. ६९२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (१), ११८ (१), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.




