राहुरीचे भूमिगत गटार काम करणाऱ्या ठेकेदाराने राहुरीच्या रस्त्याचे केले वाटोळे. _ देवेंद्र लांबे
राहुरी : दि.21.जुन
राहुरी नगर पालिकेचे मुखायधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पा.यांनी राहुरी शहरात भूमिगत गटार काम करणाऱ्या ठेकेदाराच्या निकृष्ठ काम बाबत संताप व्यक्त केला आहे.
या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पा.म्हणाले की, राहुरी शहरातील बहुतेक रस्त्याची नव्याने कामे करण्यात आली होती.शहरातील रस्ते अगदी सुस्थितीत होते.परंतु गेल्या वर्षी शासनाने शहरातील सांडपाणी नियोजनासाठी भूमिगत गटार करण्याचे नियोजन केले.त्या दृष्टीने ठेकेदार देखील नियुक्त करण्यात आले आहेत,कामे देखील सुरू करण्यात आलेली आहेत.
सबंधित ठेकेदाराने भूमिगत गटार काम झाल्यानंतर रस्ते पूर्ववत दुरुस्त करून देणे गरजेचे होते परंतु सबंधित ठेकेदाराने काम करत असताना सर्व नियम धाब्यावर बसविले आहे असे समोर येत आहे.
भूमिगत गटार काम करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे दि.२६ मे २५ रोजी महामार्गावर खड्डे खुदाई करून निघालेली माती टाकल्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झालेला आहे.
पालिका प्रशासन भूमिगत गटार काम करणाऱ्या ठेकेदाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे की काय ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला निर्माण झाला आहे.
राहुरी शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाले आहे.
पालिका प्रशासनाने तात्काळ सबंधित ठेकेदाराकडून ज्या ठिकाणी खोदाईचे कामे करण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी रस्ते पूर्ववत करून घ्यावेत.सबंधित ठेकेदारावर पालिका प्रशासनाने कारवाई न केल्यास कुठलीही पूर्व कल्पना न देता आंदोलन छेडण्यात येईल असे देवेंद्र लांबे यांनी म्हटले आहे.




