राहुरी सार्वमंथन /प्रतिनिधी
श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार संपादक बाळासाहेब आगे पाटील यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुंडाकडून सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहुरी तालुका पत्रकार मित्र संघाच्या वतीने सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला असून तहसीलदार अन् पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन धमकी देणा-या गुंडावर कठोरात-कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजता तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर येथील वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब शंकराव आगे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेब आगे यांनी 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या dainik_jay_baba_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेच्या इंजेक्शनसह महिला अटक झाल्याची बातमी व संबंधित एसडीपीओंचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या वृत्तात आरोपी गणेश मुंडे याचे नाव आले होते. त्यानंतर _ganesh._.mundhe_307 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे वृत्त डिलीट कर, नाहीतर तुला डिलीट करून टाकीन अशा आशयाचा धमकीचा संदेश आला. पत्रकाराला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने पत्रकार समाजात संतापाची लाट उसळली आहे. सदर घटनेचा आम्ही राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र निषेध करत असून घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करून कठोरत कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे
सदर निवेदनावर विलास कुलकर्णी, सुनिल भुजाडी, संजय कुलकर्णी, राजेंद्र वाडेकर,निसारभाई सय्यद,रफिकभाई शेख, सुनिल रासने राजेंद्र उंडे, कर्णा जाधव, अनिल कोळसे, रियाज देशमुख, विनित धसाळ, गोविंद फुणगे, श्रीकांत जाधव, बंडु म्हसे, प्रभाकर मकासरे, मनोज साळवे, शरद पाचरने रूषी राऊत, आकाश येवले, गणेश विघे, श्रेयश लोळगे, राजेंद्र आढाव राजेंद्र परदेशी, प्रसाद मैड,आप्पासाहेब मकासरे,आशिष संसारे, सतिष फुलसौंदर, जालिंदर आल्हाट, महेश कासार,अशोक मंडलिक, आर.आर जाधव आदींसह पत्रकारांच्या सह्या आहेत.




