गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी…
मुंबई/ सार्वमंथन प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना व्हॉट्सअॅपवरून भीषण बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. संदेशात 34 वाहनांत बॉम्ब बसवला असून 400 किलो RDX आणल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणामुळे शहरात हाय अलर्ट जाहीर करून नाकेबंदी, संशयित वाहनांची तपासणी आणि सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. सायबर सेल आणि ATS तपास करत असून धमकी खरी की खोटी याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे




