spot_img
18.2 C
New York
Sunday, September 20, 2026

Buy now

spot_img

राहुरीत रेशन धान्याचा काळाबाजार उघड! सोनगाव सात्रळमध्ये 12 लाखांचा मुद्देमाल जप्त… स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; तरुण अटकेत, दोन वाहनांसह गहू-तांदळाचा साठा पकडला

राहुरी प्रतिनिधी |

जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर लगाम घालण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने मोठा धक्का देत राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ शिवारात रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार उघडकीस आणला आहे. या कारवाईत तब्बल 12 लाख 2 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सोनगाव सात्रळ येथील साई बालाजी फर्निचर शेजारील पत्र्याच्या गोडाऊनमध्ये रेशनिंगचा गहू व तांदूळ काळ्या बाजारासाठी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व त्यांच्या पथकाने छापा टाकला असता, यासिर सादिक तांबोळी (वय 26, रा. सोनगाव सात्रळ) हा गोडाऊनमध्ये आढळून आला. चौकशीत त्याने आजूबाजूच्या रेशन दुकानांमधून धान्य काळ्या बाजाराने खरेदी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत 6990 किलो गहू (121 गोण्या) व 5860 किलो तांदूळ (117 गोण्या) असा एकूण 12,850 किलो धान्यसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय दोन वाहनेही जप्त करण्यात आली असून एकूण मुद्देमालाची किंमत 12,02,700 रुपये इतकी आहे.

आरोपीसह मुद्देमाल राहुरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे रेशनिंग धान्याच्या काळाबाजारावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून, स्थानिक पातळीवर कोणाच्या आशीर्वादाने हा काळाबाजार सुरू होता, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. प्रशासन यापुढे कोणती मोठी नावे उघड करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

पालकमंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाज! ढोल पथकात जाऊन वाजवला दणदणीत ढोल.

पालक मंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाजे! ढोल पावताला वाजवला दाणदणीत ढोल. श्रीरामपूर गणेशोत्सव उत्साह शिगेला भेटायला हवे होते. सार्वजनिक गणेशोत्सव श्रीरामपूर दौऱ्यांवर विखे पाटलांनी ढोल...

सामाजिक कार्यकर्ता नाना डोंगरे को ‘दादा साहब फाल्के स्मृति दिवस सम्मान पुरस्कार’ से सम्मानित किया गया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!