spot_img
21.4 C
New York
Saturday, September 19, 2026

Buy now

spot_img

देवळाली प्रवरेत या वादातुन अजित मुसमाडेंना बदडले…!

देवळाली प्रवरेत या वादातुन अजित मुसमाडेंना बदडले…!

तिन शेतकऱ्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाख

देवळाली प्रवरा/

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे ऊसतोडणीच्या कारणावरून वाद चिघळत अजित मुसमाडे यांना तिघांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नातेसंबंधांमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी अजित बाळासाहेब मुसमाडे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, शेतातील ऊस का तोडला याचा जाब विचारताच वादाने अचानक उग्र रूप धारण केले. यावेळी आरोपींनी संतापाच्या भरात शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी प्रशांत रमेश मुसमाडे, लक्ष्मण उत्तम मुसमाडे व उत्तम कृष्णाजी मुसमाडे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, या घटनेची देवळाली प्रवरा परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

Related Articles

पालकमंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाज! ढोल पथकात जाऊन वाजवला दणदणीत ढोल.

पालक मंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाजे! ढोल पावताला वाजवला दाणदणीत ढोल. श्रीरामपूर गणेशोत्सव उत्साह शिगेला भेटायला हवे होते. सार्वजनिक गणेशोत्सव श्रीरामपूर दौऱ्यांवर विखे पाटलांनी ढोल...

सामाजिक कार्यकर्ता नाना डोंगरे को ‘दादा साहब फाल्के स्मृति दिवस सम्मान पुरस्कार’ से सम्मानित किया गया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!