राहुरीत अॅपे रिक्षा चालक-मालक संघटनेकडून अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
लोकशाहीरांच्या विचारांना अभिवादन; प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना
राहुरी :
राहुरी तालुका अॅपे रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती राहुरी स्टँड परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच अनेक रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची आठवण उपस्थितांनी यावेळी काढली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याण जगधने होते. उपाध्यक्ष संजूभाऊ जगधने, राजेंद्र आडगळे, आयुबभाई इनामदार, अन्वरभाई शेख, नबीभाई शेख, असलमभाई शेख, संतोष वाकचौरे, हरिभाऊ पवार, विजय नन्नवरे, विश्वास जगधने, सुनील शेलार, बाबासाहेब शेलार, सोमनाथ रतन जगधने, मुकुंद जगधने, गणेश शिरसाठ, सोहेलभाई शेख, इम्रान बागवान, अच्युत पुजारी, अमोल भांड आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मनसेचे जिल्हाध्यक्ष भाऊराव उंडे पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.






