अहिल्यानगर /
भाजपच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदावर पुन्हा नेवासा तालुक्याला संधी मिळाली आहे. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. विधानसभा निवडणूकीत आ. लंचेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत शिंदे सेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर भाजपच्या उत्तर जिल्ह्याध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल याची उत्सुकता होती. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भूमिककेला विशेष महत्त्व होते. या निवडीमुळे नेवासा तालुक्यातील गावोगावी भाजपाचे संघटन वाढेल तसेच उत्तर नगर जिल्ह्यातही भाजपला बळ मिळेल, प्रामाणिक कार्यकर्त्यास न्याय मिळेल आणि पक्ष संघटना वेग घेईल, असे घोडेगावचे सरपंच राजेंद्र देसरडा यांनी सांगितले. तर दिनकर यांच्या निवडीने प्रामाणिक भाजप कार्यकर्त्यांना पक्षात न्याय मिळेल, असे भानसहिवरे येथील पोपट शेकडे यांनी संगितले. भाजप विधानसभा संयोजक सचिन देसरडा यांनीही दिनकर यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. दिनकर यांच्या निवडीने पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांस न्याय मिळाला असून उत्तर नगर जिल्ह्यात पक्ष दिनकर यांच्या नेतृत्वात भरारी घेईल, असे देसरडा यांनी म्हटले आहे.




