राहुरी : दि.१७ मे
बीड जिल्ह्यात सहा बियर बार व परमिट रुम मध्ये लाखो रुपयांची दारु चोरणाऱ्या आरोपीच्या राहुरी पोलीस पथकाने मुसक्या आवळून जेरबंद केले. तसेच त्याच्याकडून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला.
या घटनेतील आरोपी दिपक अरुण चव्हाण, वय वर्ष २८ रा. नेवासा फाटा, तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर याने काही दिवसांपूर्वी बिड जिल्ह्यात सहा ठिकाणचे बियर बार व परमिट रुम मध्ये सहा लाख रुपए किंमतीचे ३५ विदेशी दारुचे बाॅक्स चोरी केल्याची घटना घडली होती.
या घटने बाबत बिड जिल्ह्यातील चकलंबा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर आरोपी चोरलेला मुद्देमाल घेऊन राहुरी येथे येत असल्याची खबर हवालदार सुरज गायकवाड, यांना मिळाले असता त्यांनी प्रमोद ढाकणे, राहुल यादव, सचिन ताजणे, नदीम शेख, अंकुश कुर्हाडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस पथकाने सापळा लावून आरोपी दिपक चव्हाण याच्या मुसक्या आवळून जेरबंद केले. आरोपीने गुन्ह्याची गुन्ह्याची कबूली दिल्या नंतर त्याच्याकडून २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर सदर आरोपी व मुद्देमाल चकलांबा पोलीस ठाण्यातील तपासी अंमलदार पोलिस हवालदार रमेश भोले व हनुमंत इंगोले यांच्या ताब्यात घेण्यात आला.




