spot_img
19.2 C
New York
Sunday, September 20, 2026

Buy now

spot_img

राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातून अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या दरम्यान अपहरण….

राहुरी तालुक्यातील निंभेरे परिसरातून दि. १६  मे रोजी रात्रीच्या दरम्यान एका अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली.

१५ वर्षे ११ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तीच्या कुटुंबासह राहुरी पोलीस निंभेरे परिसरात राहते. दि. १६ मे २०२५ रोजी रात्री घरातील लोकांनी जेवण केल्या नंतर पिडीत मुलगी १२.१५ वाजे पर्यंत टिव्ही पाहत होती. त्यानंतर ती झोपी गेली.

दि. १७ मे २०२५ रोजी पहाटे ४ वाजे दरम्यान पिडीत मुलीच्या वडिलांना जाग आली. त्यावेळी त्यांची मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात तीचा शोध घेतला. मात्र ती कोठेही आढळून आली नाही.

आपल्या मुलीला कोणीतरी फूस लावून तीचे अपहरण केले. अशी तिच्या नातेवाईकांची खात्री झाली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानूसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ५७४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) प्रमाणे अपहरचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

पालकमंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाज! ढोल पथकात जाऊन वाजवला दणदणीत ढोल.

पालक मंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाजे! ढोल पावताला वाजवला दाणदणीत ढोल. श्रीरामपूर गणेशोत्सव उत्साह शिगेला भेटायला हवे होते. सार्वजनिक गणेशोत्सव श्रीरामपूर दौऱ्यांवर विखे पाटलांनी ढोल...

सामाजिक कार्यकर्ता नाना डोंगरे को ‘दादा साहब फाल्के स्मृति दिवस सम्मान पुरस्कार’ से सम्मानित किया गया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!