spot_img
28.9 C
New York
Wednesday, June 3, 2026

Buy now

spot_img

सोमवार राहुरीत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ पालखी पादुका यात्रा परिक्रमा, व दर्शन सोहळा….

राहुरी: दि.२१ मे
सोमवार दि. २६ मे २०२५ रोजी स्वामींची पालखी राहुरी मुक्कामी येत आहे. ठिकाण :- मारुती मंदिर, शनी चौक, राहुरीत सालाबाद प्रमाणे याही वर्षी राहु केतुच्या नगरीत  श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्वयंभु पादुकांचे दर्शन होणार आहे.
स्वामींचे दर्शन महाराष्ट्रातील लोकांना घडावे, ज्यांना आर्थिक अडचणीमुळे व अनेक कारणाने श्री क्षेत्र अक्कलकोट (समाधी स्थान) येथे येता येत नाही, त्यासाठी पालखीच्या रुपाने श्री स्वामी प्रत्यक्षात आपल्या राहुरी शहरात सोमवार दि. २६ मे २०२५ रोजी येत आहेत. दर्शनाची व श्री अक्कलकोट स्वामी चरणी आपली निष्ठा अर्पण करण्याची अपूर्व संधी प्राप्त होत आहे. श्री स्वामींच्या साधू संतत्वाची उभ्या भारतभर ४५ वर्षापासुन दुमदुमते आहे. सर्व भक्तांना त्याच्या भक्तीची लौकीक व अलौकीक अनुभवता येऊन त्यांचे जीवन संपन्न, प्रसन्न बनत आहे.
श्री अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे आगमन दुपारी ५ वाजता राहुरी शहरात शनी मारुती मंदीरात श्री स्वामींची पालखी भक्तांच्या दर्शनासाठी ठेवली जाईल.
सायंकाळी ६.०० वाजता श्री अक्कलकोट स्वार्मीच्या पालखीची मिरवणूक शनी मंदिरापासून सुरु होईल. पालखी शनि मंदिरापासुन नवीपेठ मार्गे सांवता हॉटेल मार्केट कमेटी समोरुन नगर-मनमाड रोडने डॉ. जयंत कुलकर्णी हॉस्पीटल चौकातून शुक्लेश्वर मंदीर, शिवाजी चौक, नगरपालिका ऑफिस जवळून शनी मंदिराजवळ पालखी येईल तेथे शोभेची दारु उडवून श्री स्वार्मीच्या पालखीचे स्वागत होईल व तद्नंतर मारुती मंदिरात श्री स्वार्मीची पालखी विराजमान होईल, तरी जास्तीत जास्त भक्तांनी मिरवणूकीमध्ये सहभागी होऊन स्वामींच्या सेवेचा लाभ घ्यावा व मिरवणूकीची शोभा वाढवावी. रात्री ठीक ९.३० वाजता श्री स्वामींची महाआरती होईल.
श्री स्वामी समर्थ प्रेरणेने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ गुरुपौर्णिमेच्या पर्वावर १९८८ साली स्थापन झाले असुन दैनंदिन दोन्ही वेळेस रोज हजारो भक्तांना अन्नदान महाप्रसाद (मोफत) दिला जातो. शिवाय श्रीस्वामी पुण्यतिथी आणि इतर उत्सवाच्या वेळेस विशेष अन्नदान असते. मंडळाने संपादन केलेल्या १२ एकर जागेवर परगांवच्या भक्तांकरिता भव्य असे यात्री निवास-१ व यात्री भुवन-२ चा पहिला टप्पा कार्यरत असुन महाप्रसाद व प्रतिक्षा गृह, उपासनेसाठी ध्यानमंदिर गोशाला व धार्मिक ग्रंथालय इ. ३५ कोटी खर्चाचा भव्य प्रकल्प उभारण्याचे काम चालू आहे. या स्वेच्छादानात आपण सुध्दा सहभागी व्हावे, ही विनंती. श्री स्वार्मीच्या इच्छापूर्तीसाठी आपला सर्वांचा सहभाग व्हावा म्हणून ज्या भाविक भक्तांना मदत करावयाची असेल तर सोमवार २६ मे २०२५ रोजी शनी मारुती मंदिरात श्री स्वामी पालखी समक्ष जमा करु शकता.
तसेच स्वामींचे दर्शन घेण्याचे आवाहन श्री अक्कलकोट स्वामी समर्थ भक्त मंडळ व राहुरी शहर व तालुक्यातील मंडळांनी केली आहे.

Related Articles

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधान परिषदेचे सभापती शिंदे मंत्री विखेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल..

अहिल्यानगर/ सार्व मंथन /प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सोमवारी दमदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज...

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती     कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त सेवा-समर्पणाचा संदेश; अक्षयदादा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम गाजला     दिव्य सार्वमंथन/ प्रतिनिधी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!