spot_img
32.8 C
New York
Friday, June 5, 2026

Buy now

spot_img

लग्न सोहळ्यातील बस्त्याच्या दिवशीच तरुणाने संपविली जिवन यात्रा….

राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना…
राहुरी फॅक्टरी दि.30 मे.
राहुरी तालुक्यातील तांभेरी  येथिल 21 वर्षीय  मजुरी करणाऱ्या आदिवासी समाजाच्या तरुणाने कुठल्यातरी नैराश्यातून वन खात्याच्या जमिनीत असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली असुन मयत तरुणाचे नाव विजय दिगंबर जाधव असे समजले आहे.
विजय जाधव या तरुणाचा 10 जून रोजी विवाह संपन्न होणार होता.
या घटनेमुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
आज शुक्रवारी कुटुंबातील सर्वच नातेवाईक लग्न सोहळ्याचा बस्ता बांधण्यासाठी जाणार होते. मी जेवन करुन येतो असे सांगून विजय गेला व आपली अखेरची जिवन यात्रा संपवली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल विजय जाधव या मजुरी करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने घरापासून काही अंतरावर असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रातील लिंबाच्या झाडाला कुठल्या तरी नैराश्यातून गळफास घेऊन आपली अखेरची जिवन यात्रा संपवली आहे.
या तरुणाच्या पश्चात आई वडील भाऊ बहिण असा परिवार आहे.
या तरुणाने नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्याचे पाऊल उचलले हे मात्र सध्या तरी गुलदस्त्यात आहे.

Related Articles

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधान परिषदेचे सभापती शिंदे मंत्री विखेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल..

अहिल्यानगर/ सार्व मंथन /प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सोमवारी दमदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज...

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती     कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त सेवा-समर्पणाचा संदेश; अक्षयदादा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम गाजला     दिव्य सार्वमंथन/ प्रतिनिधी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!