spot_img
-0.2 C
New York
Wednesday, December 3, 2025

Buy now

spot_img

अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा साधेपणा लय भारी…!

पोलीस कर्मचाऱ्यांच्या डब्यातील पोळीभाजीचा पोलीस अधीक्षकांनी घेतला आनंद..
अहिल्या नगर/
अहिल्यानगर जिल्ह्यातील चौडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त चौंडी बंदोबस्त करीत असताना एका झाडाखाली जेवायला बसलेले अंमलदार यांना पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आवर्जून अंमलदार यांच्या डब्यातली पोळी भाजी आनंदाने घेतली. या कृती मुळे पोलीस अधीक्षकांना आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल आपुलकी दिसून येत आहे.
सोमनाथ घार्गे हे सध्या अहिल्यानगर  जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे, तसेच श्रीरामपूर येथे ते पोलिस उपअधीक्षक म्हणून देखील होते.
सोमनाथ घार्गे यांची उल्लेखनीय कामगिरी राज्यात नांगऱ्या टोळीचा पर्दाफाश त्यांनी राज्यभरात सराफी पेढीवर दोरडे घालणाऱ्या कुख्यात नांगऱ्या टोळीचा छडा लावला होता.
लोकाभिमुख पोलीस प्रशासनः रायगडमध्ये असताना त्यांनी पोलीस प्रशासनाला लोकाभिमुख बनवण्यासाठी प्रयत्न केले, आणि शिस्तप्रिय आणि मितभाशी अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
अहिल्यानगरात दाखल झाल्यावर त्यांनी कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेऊन आपल्या कामाची सुरुवात केली
आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे हेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी चौंडी येथे पोलीस कर्मचारी यांच्या डब्यातील पोळी भाजी घेत जेवण करीत आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे नव्याने सुरू झालेले पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे पोलीस खात्याबरोबर जनतेतूनही कौतुक होत आहे.

Related Articles

राज्यातील पहिल्या टप्प्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.. 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर ला मतमोजणी

मुंबई सार्वमंथन/   राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका...

५ नोव्हेंबरला राहुरीत भाजप-महायुतीचा निर्धार मेळावा नामदार राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांना देणार मार्गदर्शन

राहुरी / प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवसंजीवनी देणारा ठरणारा भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा     निर्धार मेळावा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!