शनिशिंगणापुर हे जगप्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखले जाते
साडेसाती त्रास होऊ नये म्हणून अथवा प्रभाव कमी व्हावा यासाठी शनिची पुजा आर्चा श्रध्दाळु भाविक भक्त करतात श्रीशैनेश्वर महाराजाचे शनिशिंगणापुर जगावेगळे असून.
62 वर्षा पुर्वी हे शनी ट्रस्ट स्थापन झाले गावातीलच ट्रस्टी घ्यायची घटना अस्तित्वात आहे.
घराला दारे नसनारे जगावेगळे गाव म्हणून शनिशिगणापुर नाव लौकिक आहे. साडेसातीचा फेरा सुरु झाल्यानंतर प्रत्येकजण येथे येतो आणि मंदीर नसलेल्या देवाला म्हणजेच शनिमहाराजांना तेल वाहुन जातो येथील भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून देशातील नामांकित देवस्थानापैकी एक म्हणून शनिशिंगणापुर नाव घेले जाते मात्र गैर कारभारा मुळे संध्या हे देवस्थान चर्चेत आले आहे. मुळात देवस्थान चे दिवंगत माजी अध्यक्ष बाबूराव बानकर यांच्या नंतर येथील विश्वस्त नियुक्तीला नाही म्हटल तरी राजकीय वास लागलाच स्थानिक लोक यावर धर्मदाय न्यास नियुक्त करीत असते तशी देवस्थान घटना आहे.
श्री शनैश्वराची देशभरात जी प्रमुख सहा स्थाने त्यापैकी शिंगणापूर एक!
शनिशिगणापुर येथे स्वयंभु शनिमहाराजाची मुर्ती आहे. अखंड काळा पाषाण असलेल्या या मूर्तीची उंची 59इंच असून रुंदी 1.6 इच आहे
पुर्वी येथे पूजेसाठी ओल्या अंगाने तेल लागायचे मात्र महिलांना चौथर्यावर प्रवेशा साठी मोठे आदोलन झाले व
चौथर्यावर दर्शनाला जाण्या साठी पावती सुरु झाली अण अॅप ही आला आता हा अॅप देवस्थानचा की कोणा खाजगीचा हे तपासात उघड होईलच मात्र यावर कितीची उलाढाल झाली हे देखील तपासात कळेल.
आर्थिक अनियमिता आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप सध्याच्या विश्वस्त मंडळार होत असून याची योग्य ती चौकशी करण्यात येणार आहे व दोषी आढळून आल्यास फौजदारी कारवाई ला देखील याना सामोर्य जावे लागेल.
अनावश्यक नोकर भरती तसेच बनावट अॅप याचा तारांकित प्रश्न विधान संभेत नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे व आमदार सुरेश धस यांनी उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले.
आगामी विधान संभा काळात येथील कर्मचारी बऱ्याच ठिकाणी प्रसाद वाटीत असल्याची चर्चा होती.
तसेच मागील काही दिवसांपासून नगरचे आमदार संग्राम जगताप व काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी
यांनी देखील या देवस्थान मध्ये मुस्लिम कर्मचारी येथे कामगार ठेवू नका म्हणून देवस्थान वर मोर्चा आणला होता तेव्हा दीडशेहून अधिक कर्मचारी उपस्थित नसल्याचा ठपका ठेवून सेवेतून कमी करण्यात आले व येथे नेमके कामगार किती याची चौकशीझाली तर येथे 2 हजार 474 असल्याचे समोर आले अगदी सुरुवातीला 258 कर्मचारी होते नंतर कामगार वाढत गेले मात्र नोकर भरतीच्या नियमांची पाय मल्ली केली गेली.
अतिशय गंभीर बाब म्हणजे
देवस्थान च्या नावाने बनावट अॅप तयार करून यावर मोठ्या प्रमाणावर शनि महाराज यांच्या अभिषेक व पुजे
साठी पैसे घेण्यात आले असून नेमके किती पैसे जमा झाले याची तपासणी शासन स्तरावर करण्यात येणार आहे तसा गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सायबर पोलीस अधिकारी करणार आहेत.
शनिशिगणापुर देवस्थान विश्वस्त मंडळाला चौकशीला सामोर्य जावे लागणार आहे. येथे घराला दारे नाहीत व येथे चोरी होत नाही ही आख्यायिका होती मग अॅप वर पैसे स्विकारुन काय केले ही झालेली फसवणूक कशात गणली जाते. अनेक भाविक श्रध्दाळु मानसिक समाधान मिळावे म्हणून येथे येत असतात मात्र येथे अलीकडेच व्ही आय पी संस्कृतीने जन्म घेतला नाही तर नवलच.
कदाचित यानंतर शासन नियुक्त विश्वस्त मंडळाच्या हाती कारभार गेला तर आश्चर्य वाटु नये.कारण या देवस्थान वर संध्या माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व आहे.
खरच शनि ची साडेसाती त्रासदायक असते असे बोलले जात असले तरी येथे शनिलाच गैरव्यवहाराची साडेसाती लागलीय?शनिची साडेसाती काही ठराविक काळानंतर जाते असे म्हणतात मात्र येथे शनिलाच साडेसाती लागलीय ?
भाविकांची गैरसोय होऊ नये व वाढती संख्या लक्षात घेता कर्मचारी देखील घेतले असतील मात्र बोगस अॅप वर जमा केलेल्या पैशाचे काय.
अलिकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , केद्रीय गृह मंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देखील शनि दर्शन घेवून गेलेत, राजकीय नेते,उद्योजक, चित्रपट अभिनेते, खेळाडु व असंख्य श्रध्दाळु भाविक शैनश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन पुजा पाठ अभिषेक करत असतात.
तसे ट्रस्ट मार्फत विविध विकास कामे देखील झालेले आहेत हे नाकारून चालणार नाही . डिसेंबर महिन्यात या विश्वस्तांची मुदत संपत आहे त्या आगोदर बरखास्त करून नवीन शासकीय विश्वस्त निवडले जातील अशी चर्चा आहे.




