राहुरी विशेष /प्रतिनिधी
राज्यातील नगर परिषदे ची प्रारुप प्रभाग रचना जाहीर होणार असल्याने नगरपरिषदेंच्या निवडणूकांचा उद्यापासून बिगुल वाजणार असुन यामध्ये होणारी नवीन वार्ड रचना कोणाच्या पाथ्यावर पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेली चार वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने अनेक संस्थेवर प्रशासकराज सुरू आहे.
त्यामुळे नागरी सुविधा व होणाऱ्या विविध विकास कामांना खिळ बसत नागरिकांमधून बोलले जातंय.
प्रशासक राजा असल्याकारणाने नागरिकांना मोठ्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
उद्या सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्रारुप प्रभाग रचना जाहीर होणार आहे.
18 ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट हरकती मागवण्यात येणार आहे.
सन २०२५ मध्ये होणाऱ्यासार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी आणि त्यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात येत असल्याची प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक सोमवार, दिनांक १८/०८/२०२५ हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी (हरकती व सूचना मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायत यांच्याकडे सादर कराव्यात) अशा सुचना करण्यात आल्या आहेत.




