श्रीरामपूर सार्वमंथन /प्रतिनिधी
दत्तनगर फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो दत्तनगर गाव आज पुन्हा एकदा ऐतिहासिक निर्णयामुळे चर्चेत आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारण्याच्या प्रस्तावास ग्रामपंचायतीने एकमताने मंजूरी दिली आहे.
भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सचिन ब्राह्मणे, ग्रामपंचायत सदस्य संजय बोरगे आरपीआयचे भीमराज बागुल प्रदीप गायकवाड दादासाहेब बनकर यांनी पंधरा दिवसांपूर्वी सरपंच सारिकाताई कुंकूलोळ व ग्रामसेवक रुबाब पटेल यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनात त्यांनी म्हटले होते की जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गावठाण साठी दिलेल्या सोळा एकर जागेतील काही भागात स्मारक व्हावे, अशी ठाम मागणी केली होती. सदर ठिकाणी सध्या घरकुल योजनेचे काम सुरू आहे.
ही मागणी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रवी अण्णा गायकवाड यांनी देखील मान्य करत, ठरावास पाठिंबा दिला. ग्रामसभेतील सर्व सदस्य व ग्रामस्थांनीही एकमुखाने स्मारकाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक दत्तनगरमध्ये साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठराव मंजूर करताना पंचायत समितीचे माजी सभापती नाना शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबा दिघे, ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद कुंकूलोळ, सुरेश जगताप, शहाजानभाई बागवान, राजू मगर, मोहन आव्हाड, राजूभाऊ खाजेकर, सुरेश शिवलकर, विशाल पठारे, विश्वास भोसले, राहुल आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते.
स्मरकासाठी साकार करण्यात येणाऱ्या पुतळ्याचे स्मारकाचे मार्गदर्शन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी केले तसेच सचिन ब्राह्मणे यांनी केलेल्या कामाला यश आल्यामुळे त्यांचे पंचक्रोशीत व सर्वत्र कौतुक होत आहे . हा निर्णय केवळ दत्तनगरसाठीच नव्हे, तर सर्व बाबासाहेबांचे अनुयायी व सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या चळवळींसाठी एक प्रेरणास्थान ठरणार आहे.




