spot_img
19 C
New York
Thursday, June 4, 2026

Buy now

spot_img

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या मेळाव्यासाठी संगमनेरला येणार…

संगमनेर सार्वमंथन  विशेष/
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीत आमदार अमोल खताळ यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडक ल्यानंतर प्रथमच संगमनेरात येत आहे.त्यामुळे शिवसेना महायुतीच्या वतीने त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे.त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाणता राजा मैदानावर रविवारी दुपारी ४:०० वाजता महाविजय मेळावा होणार आहे.
जाणता राजा मैदानावर  होणाऱ्या महायुतीच्या महा विजय मेळाव्यास राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,राज्याचे पर्यटन मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे संपर्क मंत्री शंभुराजे देसाई,शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे,माजी.खासदार डॉ.सुजय विखे पाटील, नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह इतर महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आमदार अमोल खताळ पाटील आणि महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन होणार आहे.त्यानंतर सजविलेल्या रथातून रॅलीद्वारे उपमुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढून रोड शो करण्यात येणार आहे. ही मिरवणूक नवीन अकोले रोड बसस्थानक नवीन नगर रोड वरून राजपाल कॉर्नर मार्गे जाणता राजा मैदानावर जाणार आहे.

Related Articles

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधान परिषदेचे सभापती शिंदे मंत्री विखेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल..

अहिल्यानगर/ सार्व मंथन /प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सोमवारी दमदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज...

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती     कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त सेवा-समर्पणाचा संदेश; अक्षयदादा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम गाजला     दिव्य सार्वमंथन/ प्रतिनिधी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!