spot_img
3.8 C
New York
Saturday, November 14, 2026

Buy now

spot_img

बेलापूर चौकात चेन स्नॅचिंगचा थरार; ग्रामस्थांनी एकाला पकडले, दुसरा पसार! महिलेच्या आरडाओरडाने चोरट्यांची धावपळ; संतप्त जमावाकडून संशयिताला चोप देण्याचा प्रयत्न

बेलापूर चौकात चेन स्नॅचिंगचा थरार; ग्रामस्थांनी एकाला पकडले, दुसरा पसार..!

महिलेच्या आरडाओरडाने चोरट्यांची धावपळ; संतप्त जमावाकडून संशयिताला चोप देण्याचा प्रयत्न..

 

 

कोल्हार / सार्वमंथन नेटवर्क/अरुण बोरुडे

कोल्हार येथील बेलापूर चौक परिसरात रात्रीच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील डोरले हिसकावून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयितांनी चांगलाच थरार निर्माण केला. मात्र महिलेच्या आरडाओरडाने ग्रामस्थ सतर्क झाले आणि त्यांनी प्रसंगावधान राखत पाठलाग करून एका संशयिताला पकडले. दुसरा संशयित मात्र गर्दीचा फायदा घेत मोटारसायकलवरून पसार झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेआठच्या सुमारास भाजीपाला व्यावसायिक शोभा प्रविण देशमाने या आपल्या सासूसोबत घराकडे जात होत्या. त्या बेलापूर चौक परिसरात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन संशयितांनी त्यांच्या गळ्यातील डोरले हिसकावण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकाराने दोघींनी आरडाओरड सुरू केली.

महिलेचा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थ जमा होत असल्याचे लक्षात येताच दोन्ही संशयितांनी मोटारसायकलवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला. त्यामध्ये एका संशयिताला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले, तर दुसरा संशयित गर्दीचा फायदा घेत पसार झाला.

संशयित पकडला गेल्यानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला. संतप्त झालेल्या काही ग्रामस्थांनी संशयिताला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने संकेत संजय खर्डे यांनी वेळीच मध्यस्थी करून संशयिताला जमावाच्या तावडीतून बाहेर काढले. त्यानंतर संजय शिवलेकर यांनी ग्रामस्थांना शांत करत पोलिसांशी संपर्क साधला.

माहिती मिळताच संशयिताला लोणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. नागरिकांनी दाखविलेली तत्परता आणि वेळीच पोलिसांना माहिती दिल्यामुळे चेन स्नॅचिंगच्या या प्रयत्नातील एका संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देणे शक्य झाले.

दरम्यान, पसार झालेल्या दुसऱ्या संशयिताचा शोध घेण्यासाठी लोणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेतील संशयितांची ओळख, चोरीचा प्रयत्न आणि वापरण्यात आलेल्या मोटारसायकलबाबत पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.

महिलेच्या आरडाओरडाने सुरू झालेला हा प्रकार काही क्षणांतच ग्रामस्थांच्या पाठलागापर्यंत पोहोचला. त्यामुळे चोरट्यांचा डाव फसला आणि एक संशयित ग्रामस्थांच्या हाती लागला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी होण्यापासून बचाव झाला.

Previous article
Next article

Related Articles

निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश. राहुरीच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; १५ दिवस सुरू राहणार आवर्तन, उभ्या...

मंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने ४८८ कर्मचाऱ्यांच्या सेवाकायमीचा मार्ग मोकळा

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय   मंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने ४८८...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!