spot_img
4.9 C
New York
Saturday, November 14, 2026

Buy now

spot_img

निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश.

राहुरीच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; १५ दिवस सुरू राहणार आवर्तन, उभ्या पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

 

अहिल्यानगर /

राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याला उद्या (दि. १५) संध्याकाळी सहा वाजता पाणी सोडण्यात येणार आहे. आमदार अक्षय कर्डिले यांनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पाणी सोडण्याचा निर्णय मार्गी लागला आहे.या आवर्तनाचे पाणी १७ ते १८ नोव्हेंबरपर्यंत राहुरी तालुक्यात पोहोचणार असून, त्यानंतर पुढील पंधरा दिवस कालव्याद्वारे पाणी सुरू राहणार आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील कानडगाव, निमढेरे, तुळापूर, कामधेनू परिसर, कनगर, गणेगाव, चिंचविहिरे आणि गुहा यांसह पश्चिम भागातील गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.सध्या या भागातील शेतकऱ्यांसमोर उभ्या पिकांना पाणी देण्याचे मोठे आव्हान होते. त्याचबरोबर जनावरांच्या चारा-पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार अक्षय कर्डिले यांच्याकडे कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. कर्डिले यांनी या मागणीसाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.पंधरा दिवसांच्या या आवर्तनामुळे पश्चिम राहुरीतील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना जीवदान मिळण्यास मदत होणार असून, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे.

Related Articles

मंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने ४८८ कर्मचाऱ्यांच्या सेवाकायमीचा मार्ग मोकळा

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय   मंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने ४८८...

Writing खेडले-पिंपरीत श्री गुरुदत्त महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक; सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा कानडे वस्ती येथे धार्मिक उत्सवाची जय्यत तयारी; भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन खेडले-पिंपरी (प्रतिनिधी)...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!