अनेक प्रतिष्ठित व्यापारी व घन दांडगे शेतकरी गजाआड होणार..?
राहता /
राहता तालुक्यात मोठा कापूस घोटाळा झाला असून काही दिवसात मोठा कापसू घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शासकीय अधिकारी ,बँक कर्मचारी तसेच कर्जदार यांचे संगणमताने केंद्र सरकारची व बँकेची फसवणूक करण्यात आली आहे या घोटाळ्याची व्याप्ती ही कोट्यावधी रुपयांच्या घरात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे
याबाबत संविस्तर माहिती अशी की केंद्र सरकार चे तालुक्यात काही ठिकाणी गोदाम असून या ठिकाणी शेतकरी आपला माल ठेवत असतात व त्या माध्यमातून केंद्र सरकारला भाडे मिळत असते परंतु तालुक्यातील काही बँक अधिकारी,शेतकरी यांनी संगणमताने शासनाची फसवणूक केली केली असल्याचे बोलले जात आहे. कापूस हा शासकीय गोदाम मध्ये ठेवून त्यावर वेगवेगळ्या शासकीय तसेच खाजगी बँक मधून कोट्यावधी रुपयाचे कर्ज काढण्यात आले आहे. वास्तविक कापूस गोदाम मध्ये कापूस ठेवल्यानंतर सदरील कापसावर कर्ज घेतांना काही नियम व अटी ठरलेल्या असतात परंतु शासनाचे सर्व नियम या कर्जदारांनी व संबधित बँक अधिकारी यांनी धाब्यावर बसवल्याचे दिसून आले आहे. ज्या मालावर कर्ज मिळू शकत नाही अश्या मालाच्या पावत्या संगणमताने घेण्यात आल्या व सदरील मालावर कर्ज वाटप करताना संबधित बँक यांनी सुद्धा पूर्ण पडताळणी केली नाही व संबधित कर्जदार यांना कोट्यावधी रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. मालाच्या किमती पेक्षा जास्त रकमेचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारचे कोट्यवधी रुपयाचे भाडे थकल्यानंतर सदरील घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये संबधित शासकीय गोदामचे कर्मचारी सुद्धा सहभागी असल्याची चर्चा होत आहे.
या बाबत केंद्र शासनाने या कर्ज घोटाळ्याची उच्च स्तरीय चौकशी केली असून त्यांचा अहवाल सुद्धा प्राप्त झाला असून या मध्ये मोठ मोठे राहता तालुक्यासह शेजारील वैजापूर,कोपरगाव तालुक्यातील धन दांडगे प्रतिष्ठीत व्यापारी व शेतकरी पुढील काही दिवसात गजा आड होऊन त्यांची नावे जनतेसमोर येणार आहे. परंतु या प्रकरणात शासनाच्या बँकेने व एक शेजारी तालुक्यातील मोठ्या खाजगी बँक ने कर्ज पुरवठा केला आहे.
त्यांचे कर्मचारी व संबधित बँक चे संचालक मंडळ सुद्धा संशयांच्या भोवऱ्यात सापडणार असुन संबधित कर्जदार व संबधित कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांचा लवकरच पर्दाफाश होणार आहे.




