राहुरी शहर /
राहुरी शहरात आज गुरुवारी आठवडे बाजारच्या दिवशी अचानक दुपारी दोन वाजे दरम्यान धुव्वाधार पाऊस झाल्याने बाजारकरूंची चांगलीच पळापळ झाली होती.
हवामान खात्याकडुन अंदाज वर्तविण्यात आला होता कि १३ ते ३१ मे दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट पाऊस होण्याची शक्यता आहे त्या नुसार आज गुरुवारी आठवडे बाजार दिवशी दुपारी दोन वाजेदरम्यान वरुन राज्याने हजेरी लावात बाजार करुंची त्रेधातिरपीट उडवली होती.
सुमारे अर्धा ते पाऊन तास झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच पंचाईत केली होती.
आठवडे बाजारात बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिक व महिलांनी रस्त्यालगत असलेल्या जी दुकाने असतील त्या ठिकाणी अडोसा घेण्यासाठी पळापळ केल्याची दिसुन आले.




