राहुरी फॅक्टरी परिसरात पोटात चाकू खुपसून खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांस 5 दिवसाचा पोलीस रिमांड…
राहुरी/
राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर I 577/2025 BNS 109,118(2), 115(2), 352, 351(2), 189(2), 191(2)(3), 190 प्रमाणे दिनांक 17/5 /25 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार यांना आरोपी नामे आशिष अनिल सांगळे व त्याचे इतर साथीदारांनी लाथा बुक्क्याने तसेच लोखंडी गजाने मारहाण करून आरोपी नामे आशिष अनिल सांगळे याने साक्षीदार जखमी गणेश सुनील लोंढे वय 25 राहणार चिंचोली तालुका राहुरी यास धारदार चॉपर ने पोटात वार करून चॉपर पोटात खूपसुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने राहुरी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवून तांत्रिक माहितीच्या आधारे तात्काळ मुख्य आरोपी नामे 1) आशिष अनिल सांगळे वय 24 वर्ष व अक्षय कैलास जाधव वय 26 वर्ष दोघे राहणार चिंचवीहिरे तालुका राहुरी यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक 23 मे पर्यंत पोलीस कस्टडीत रिमांड मंजूर करण्यात आला आहे. सरकारी पक्षाचे वतीने गांधले मॅडम यांनी काम पाहिले.
पोलीस अधिक्षक राकेश ओला ,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय ठेंगे, सपोनि पवार ,पोहेकॉ सतीश आवारे, पोहेकॉ जायभाये, पोहेकॉ बाबासाहेब शेळके, सुरज गायकवाड, राहुल यादव,पोलीस कॉन्स्टेबल सचिन ताजणे, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे यांनी केलेली आहे.




