spot_img
19.4 C
New York
Sunday, September 20, 2026

Buy now

spot_img

अरे चक्क…..राहुरीत वरून राजाचा कहर,रस्त्याच्या मुख्य बाजारपेठेत चहुकडे पाणीच पाणी…

...
…तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठी झाडे उन्मळून पडली तर विजेचे पोलही कोसळल्याने वीजपुरवठा खंडित..
राहुरी शहरातील तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर पाणी वाहत होते, तर शहरातील मुख्य नाल्या गटारी तुडुंब भरल्याने चहुकडे पाणीच पाणी  साचल्याचे व वाहत असल्याचे दिसून आले.
राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने अनेक मोठमोठे झाडे उन्मळून पडली तर विजेचे पोल ही पडल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
राहुरीत सुमारे अर्धा ते पाऊण  तास झालेल्या वरून राजाच्या अचानक लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांची पळापळ उडाली होती.
शहरातील वृद्ध नागरिक व बाजारपेठेतील व्यवसायिकांची पाण्यातून वाट काढताना दमछाक होत होती. 
अनेक दुचाकी चालकांनी पाण्यातून रस्ता काढत आपली दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला तर अनेकांच्या गाड्या मध्ये पाणी गेल्याने बंद पडल्याचे दिसून आले.
हवामान खात्याकडुन अंदाज वर्तविण्यात आला होता कि १७ ते २१ दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
या नुसार आज दि.१९ मे रोजी सायंकाळी पाऊने पाच वाजे दरम्यान पावसाला सुरुवात झाली तर अर्धा पाऊण तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. 
शहरातील नवी पेठ ,शिवाजी चौक, स्टेशन रोड भागीरथीबाई शाळा रोड, शुक्लेश्वर चौक या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून पाणी वाहत होते.
अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसामुळे  रस्त्याने पाई व दुचाकी वर ,चारचाकी वर, रिक्षा द्वारे, सायकलवर जातानी अनेकांना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे रस्ता ओलांडताना अडचण निर्माण झाली होती.
क्लास वरून येताना काही विद्यार्थिनींची दुचाकी स्कुटी वाहन बंद पडले होते. 
तर काही वृद्ध महिला व जेष्ठ नागरिक साचलेल्या पाण्यातून रस्ता काढून आपल्या घराकडे वाढ धरत होते..

Related Articles

पालकमंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाज! ढोल पथकात जाऊन वाजवला दणदणीत ढोल.

पालक मंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाजे! ढोल पावताला वाजवला दाणदणीत ढोल. श्रीरामपूर गणेशोत्सव उत्साह शिगेला भेटायला हवे होते. सार्वजनिक गणेशोत्सव श्रीरामपूर दौऱ्यांवर विखे पाटलांनी ढोल...

सामाजिक कार्यकर्ता नाना डोंगरे को ‘दादा साहब फाल्के स्मृति दिवस सम्मान पुरस्कार’ से सम्मानित किया गया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!