spot_img
19.4 C
New York
Sunday, September 20, 2026

Buy now

spot_img

अहिल्या नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह पाच जण व एका महिलेवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल….

अहिल्या नगर :दि.१८ मे.

अहिल्या नगर महानगरपालिके माजी महापौर तसेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर आर्थिक कारणावरुन एका तरुणास डांबून ठेवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रवींद्र रामराव शेळके यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मच्छिंद्र झेंडे, अभिषेक कळमकर, लालू उर्फ अभिषेक जगताप, तसेच एक महिलेसह अनोळखी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील आर्थिक कारणावरुन वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवून रवींद्र रामराव शेळके यांना मारहाण करून त्यांच्याकडून विविध स्टॅम्पवर बळजबरीने सह्या घेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रवींद्र रामराव शेळके हा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याकडे दहा वर्षापासून चालक म्हणून कामाला होते. मात्र कळमकर यांच्याशी आर्थिक कारणावरुन वाद झाल्याने रवींद्र शेळके याने दोन वर्षापासून चालक म्हणून असलेली नोकरी सोडून दिली होती. सहा महिन्यापूव सुद्धा रवींद्र रामराव शेळके यांच्या अंगाराव गाडी घालून मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप शेळके यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली असल्याचे सांगितले.

12 मे रोजी रवींद्र रामराव शेळके यांचे नगर सोलापूर रोडवरून पांढऱ्या व रंगाच्या टोयाटो कंपनीच्या वाहनातून आलेल्या लोकांनी अपहरण करून त्यांना चिखली या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आली. तसेच एका महिले बरोबर बळजबरीने फोटो काढून घेण्यात आले आणि त्यानंतर काही नोटरी आणि कागदपत्रांवर बळजबरीने सह्या घेतल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या पासून आपल्याला आणि कुटुंबाला धोका असल्याने शेळके यांनी केली संरक्षणाची मागणी केली आहे. याबाबत माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र या घटनेमुळे अहिल्यानगर मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये नेमकं सत्य काय आहे? याचाही छडा पोलिसांना लावणे आव्हानात्मक असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

पालकमंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाज! ढोल पथकात जाऊन वाजवला दणदणीत ढोल.

पालक मंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाजे! ढोल पावताला वाजवला दाणदणीत ढोल. श्रीरामपूर गणेशोत्सव उत्साह शिगेला भेटायला हवे होते. सार्वजनिक गणेशोत्सव श्रीरामपूर दौऱ्यांवर विखे पाटलांनी ढोल...

सामाजिक कार्यकर्ता नाना डोंगरे को ‘दादा साहब फाल्के स्मृति दिवस सम्मान पुरस्कार’ से सम्मानित किया गया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!