पर्यावरण दिनानिमित्त माफ़सूच्या संचालनालय विस्तार शिक्षण येथे वृक्षारोपण..
नागपूर दि. 07 जुन : प्रवीण बागडे
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विश्वविद्यालय (माफसू), नागपुर अंतर्गत संचालनालय, विस्तार शिक्षण आणि शेतकरी भवन परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सध्याच्या काळात मोठया प्रमाणात होणार वृक्षतोड आणि त्यामुळे वाढणारे तापमान ही गंभीर समस्या बनली आहे. या वर्षी तापमान हे 45 ते 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असुन यापुढेही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे ‘झाडे लावा, झाडे वाचवा’ ही काळाची गरज बनली आहे. वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन यावर भर देण्याचे आवाहन या कार्यक्रमात करण्यात आले.
या प्रसंगी संचालक, विस्तार शिक्षण डॉ. अनिल भिकाने, तांत्रीक अधिकारी डॉ. सारीपुत लांडगे, कास्ट्राईब महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे (नागपूर शाखा) उपाध्यक्ष प्रवीण बागडे, सचिव जितेंद्र हातमोडे, मोहन कापसे, अतुल जाधव, राजेश गहलोद आणि स्वप्नील दाते ई. प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्व अधोरेखित करण्यात आले.




