spot_img
3.6 C
New York
Monday, December 1, 2025

Buy now

spot_img

मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलकांची गैरसोय दुर करा..

मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलकांची गैरसोय दुर करा..

राहुरीतील मराठा तरुण आक्रमक …

मुंबई येथे दोन दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसलेले आहे. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधवं दाखल होत शांततेच्या मार्गाने पाठिंबा देत आहे.
मुंबई येथे जोरदार पाऊस सुरु आहे, मराठा बांधवांचे हाल व्हावे व आंदोलन मोडीत निघावे या उद्देशाने सरकारने आझाद मैदान परिसरातील व्यावसायिकांचे दुकाने बंद केलेली आहेत. सबंधित दुकाने बंद केल्यामुळे येणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पाणी, नाष्टा, छत्री यासह लागणाऱ्या दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करता येत नाहीत. त्याच बरोबर सरकारने पिण्याचे पाणी टॉयलेट ची व्यवस्थ करणे गरजेचे असताना आझाद मैदान मुंबईच्या दिशेने येणारे रस्ते जाणीवपूर्वक बंद केले आहे.
आंदोलन स्थळापासून १०-१५ किमी लांब आंदोलनांचे वाहने अडविल्यामुळे ऐन पावसाळ्यात मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल होत आहे. राज्य सरकारने जाणीवपूर्वक चालविलेले मराठा आंदोलनांचे हाल थांबवावे.
महाराष्ट्र सरकारने सबंधित विषयात दखल न घेतल्यास मराठा समाजाकडून प्रत्येक गाव खेड्यात कुठलीही पूर्व कल्पना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घेण्याचा इशारा राहुरी येथे पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात मराठा समाजाच्या तरुणांनी केला आहे. दिलेल्या निवेदनावर युवा मंच अध्यक्ष कांता तनपुरे, शरद तनपुरे, गणेश नेहे, अक्षय तनपुरे , रेवणनाथ धसाळ, संभाजी मोरे,संदीप गागरे,कृष्णा तनपुरे, मनोज म्हस्के ,मदन तनपुरे, अमोल मोढे, मयूर काल्हापुरे सचिन बोरुडे, राहुल काका तनपुरे, राजेंद्र लबडे, कुलदीप नवले, विनायक बाठे, नामदेव वांडेकर, अशोक तनपुरे, अविनाश तनपुरे, श्रीकांत डावखर, श्याम तनपुरे, विक्रम मोढे, रवींद्र हिराचंद तनपुरे, अनिल शिरसाट, अक्षय शिंदे ,अमोल तनपुरे ,शुभम तोडमल, युवराज तोडमल, कृषी कलापुरे, युवराज तोडमल, पप्पू तनपुरे, संग्राम तनपुरे, प्रवीण राऊत, कुमार डावखर, मधुकर घाडगे, राजेंद्र खोजे अदि उपस्थित होते.

 

सार्वमंथन न्युज महाराष्ट्र राहुरी अहिल्या नगर

Related Articles

राज्यातील पहिल्या टप्प्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.. 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर ला मतमोजणी

मुंबई सार्वमंथन/   राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका...

५ नोव्हेंबरला राहुरीत भाजप-महायुतीचा निर्धार मेळावा नामदार राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांना देणार मार्गदर्शन

राहुरी / प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवसंजीवनी देणारा ठरणारा भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा     निर्धार मेळावा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!