spot_img
19.2 C
New York
Sunday, September 20, 2026

Buy now

spot_img

पीआय विशाल खैरे यांच्या धडक कारवाईने अवैध धंदेगारांमध्ये खळबळ; लॉटरी व पत्त्यांच्या क्लबवर छापे*

पो.नि.पीआय विशाल खैरे यांच्या धडक कारवाईने अवैध व्यवसायिकांमधे खळबळ; लॉटरी व पत्त्यांच्या क्लबवर छापे..

 

श्रीरामपूर, दि. १८ जून (प्रतिनिधी) –

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक (PI) विशाल खैरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याअंतर्गत बुधवार (दि. १७ जून) रोजी शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या अवैध लॉटरी व्यवसाय तसेच पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली.

या कारवाईमुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून अनेकांनी आपले व्यवसाय बंद केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. पोलिसांच्या पथकाने अचानक केलेल्या छापेमारीमुळे संबंधितांमध्ये धावपळ उडाली. कारवाईदरम्यान काही साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

नवनियुक्त पीआय विशाल खैरे यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच अवैध धंद्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात जुगार, मटका, अवैध लॉटरी तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांवर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, पोलिसांच्या या धडक कारवाईचे शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा बसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

पालकमंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाज! ढोल पथकात जाऊन वाजवला दणदणीत ढोल.

पालक मंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाजे! ढोल पावताला वाजवला दाणदणीत ढोल. श्रीरामपूर गणेशोत्सव उत्साह शिगेला भेटायला हवे होते. सार्वजनिक गणेशोत्सव श्रीरामपूर दौऱ्यांवर विखे पाटलांनी ढोल...

सामाजिक कार्यकर्ता नाना डोंगरे को ‘दादा साहब फाल्के स्मृति दिवस सम्मान पुरस्कार’ से सम्मानित किया गया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!