महाराष्ट्र शासनाचा १०० दिवसांचा सुधारणा कार्यक्रम, नाशिक विभागात द्वितीय क्रमांक
अहिल्यानगर /१७ मे.
महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात पोलीस विभागात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना नाशिक विभागात द्वितीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
१०० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्तव्य पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्य शासनाने नाशिक विभागात द्वितीय क्रमांक जाहीर केला आहे.




